ट्रान्स्फॉर्मर जळाला, पाच महिन्यांपासून वीजपुरवठा बंद, शेतकऱ्यांनी केले ट्रान्सफॉर्मरवर चढून आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
गेल्या पाच महिन्यांपासून साकत येथील बोरीचा मळा येथील शेतीसाठी असलेला ट्रान्सफॉर्मर पाच महिन्यांपासून जळाल्यामुळे कृषी पंप बंद आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. कोटेशन धारकांनी बीले भरूनही पाच महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचे खुपच हाल होत आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज ट्रान्सफॉर्मरवर चढून आंदोलन केले.
सध्या परिसरात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. तरीही शेतकऱ्यांनी आपली बीले भरली पण जळालेला ट्रान्सफॉर्मर मिळालाच नाही वारंवार पाठपुरावा करूनही कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले शेवटी आज संतप्त शेतकरी ट्रान्सफॉर्मर वर चढून बसले ही बातमी महावितरणला समजताच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
आज सकाळी ट्रान्सफॉर्मरवर चढून आंदोलन आंदोलन केले यावेळी पंधरा शेतकरी होते यामध्ये द्वारकादास वराट, सुमनताई वराट, अकुंश वराट, बाळासाहेब वराट, शंकर वराट, राम वराट, राम वराट, बाजीराव वराट यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
पाच महिने झाले ट्रान्सफरमर जळला होता. अधिकाऱ्यांनी संगीतले बिले भरा, तर सर्व शेतकऱ्यांनी विजबिले एक महिना झाले भरले, तरी ट्रान्सफरमर देत नाहीत. पाऊस नसल्यामुळे पैशाची अडचण असताना, सर्व ग्राहकांनी वीज बीले भरले.आत्ता अधिकारी ट्रान्सफरमर देण्यास टाळाटाळ करत आहेत यामुळे आंदोलन करण्यात आले.
आंदोलन स्थळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, माजी सरपंच सदाशिव वराट, बाळासाहेब वराट यांनी भेट देऊन महावितरणचे अधिकारी यांना सांगितले. साकतच्या शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन समजताच महावितरणने ताबडतोब वायरमन यांना पाठवून आज सायंकाळ पर्यंत ट्रान्सफॉर्मर देतोत असे आश्वासन दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.