साखळी उपोषणास न्यु जामखेड तालुका डॉक्टर असोशिएशन व रायगड ग्रृप जामखेड च्या वतीने जाहीर पाठिंबा
जामखेड तालुक्यातील मुस्लिम समाजाने देखील दिला पाठींबा
जामखेड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड येथे वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणात तालुक्यातील साकत येथील मराठा बांधव यांनी सहभाग घेतला. या साखळी उपोषणास जामखेड येथील न्यु जामखेड तालुका डॉक्टर असोशिएशन जामखेड व रायगड ग्रृप जामखेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.
तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि २५ ऑक्टोबर २०२३ पासुन मनोज जरांगे हे आमरण उपोषणास बसले आहेत. याच अनुषंगाने जामखेड मध्ये देखील त्यांना साखळी उपोषण सुरू आहे आणि याच साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी न्यु जामखेड तालुका डॉक्टर असोशिएशन जामखेड व रायगड ग्रृप च्या वतीने पाठींबा देत आहोत तसेच जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी पाठींबा देणार आहोत. जर दोन दिवसात मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा निघाला नाही तर जामखेड तालुक्यातील हॉस्पिटल बेमुदत बंद ठेऊ असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
आंदोलना दरम्यान अध्यक्ष डॉ. संजय राऊत, डॉ. भरत देवकर डॉ. राजेंद्र पवार, डॉ दिनेश रसाळ, डॉ. सुरेश काशिद, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. संजय भोरे, डॉ. प्रदिप कात्रजकर, डॉ. आनंद लोंढे, डॉ. प्रताप चौरे, डॉ. मेघराज चकोर, डॉ. अविनाश पवार, डॉ. सादेख पठाण डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. सुशिल पन्हाळकर, डॉ. अक्षय आडाले डॉ. सचिन काकडे, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ प्रदिप कुडके, डॉ. तानाजी सावंत, डॉ. भारत दारकुंडे, डॉ जतिन काजळे,डॉ. पांडुरंग सानप डॉ. सुनिल वराट, सह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला या वेळी खलील मौलाना यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण दरम्यान आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व आरक्षणासाठी मराठा बांधवांनी हिंसक आंदोलने करू नयेत समाजातील जातीयवादी शक्तींना ओळखले पाहिजे असे जे लोक आहेत ते हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधत आहेत .
तसेच पहिले मराठा समाजाला आरक्षण द्यावे व नंतर मुस्लिम समाजाला मिळावे अशी मागणी त्यांनी या प्रसंगी केली आहे. यावेळी मोठय़ा संख्येने खलील मौलाना, जावीदभाई सय्यद, डाँ.सादेख पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमर कुरेशी, जमीरभाई सय्यद, अबरार कुरेशी, जुबेरखान, हाजी नादीरभाई, फर्मानभाई शेख, मुजिब अत्तार, चाॅद तांबोळी, आयुबभाई कुरेशी, शाबीर कुरेशी, अस्लम सय्यद, शेरखान चाचा, राजुभाई शेख आदी मराठा बांधव व मुस्लिम समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जामखेड येथील साखळी उपोषणाचा आजचा सातवा दिवस आसुन आज तालुक्यातील साकत येथील मराठा बांधव या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here