गेल्या २५ वर्षाच्या सत्तेला युवकांनी लावला सुरूग, गुगळे बाफना च्या पॅनलची बाजी, कोठारींच्या पॅनलचा उडला धुवा
प्रतिनिधी जामखेड
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जामखेड या संस्थेच्या तेरा जागेसाठी दि २९ रोजी झालेल्या निवडणुकीत गुगळे बाफना यांच्या परिवर्तन पँनलच्या आठ जागा तर कोठारी गटाच्या अरिहंत पँनलच्या तीन जागा व दोन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. या निवडणुकीत गेल्या २५ वर्षाच्या सत्तेला युवकांनी सुरूग लावला आहे .गुगळे बाफना यांच्या पॅनेलने बाजी मारली असुन कोठारीच्या पॅनलचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जामखेड या संस्थेच्या निवडणुकीत एकुण तेरा जागांसाठी तीस उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये एकुण ८२३ मतदार होते. या पैकी ७१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये दोन गट पाडण्यात आले अ गटातून पाच उमेदवार निवडून द्यायचे होते. या गटातील तेरा मते बाद झाली तर ब गटातील चौदा मते बाद झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड हर्षल डोके तर सह निवडणूक अधिकारी म्हणून ॲड ए.जे जायभाय व ॲड पी एन ससाणे तर मदतीसाठी ॲड नितीन घुमरे ॲड पप्पू थोरात ॲड सागर पवार यांनी काम पाहिले.
परिवर्तन पॅनलचे आठ विजयी उमेदवार खालील प्रमाणे-
आकाश बाफना (४४३) मंगेश बेदमुथ्था (४१२) महावीर बाफना (३८८) शरद शिंगवी (३७२) निखिल बोथरा (३३२) दिलीप गुगळे (४४८) संतोष फिरोदिया (३५०) कुंदनमल भंडारी (३७९)हे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.
अरिहंत पँनलचे तीन विजयी उमेदवार खालील प्रमाणे-
माजी अध्यक्ष कांतीलाल कोठारी (३८१),विनोद बेदमुथ्था (३४५) जितेंद्र बोरा (३५८)
अपक्षानमध्ये दोन विजयी उमेदवार खालील प्रमाणे –
संजय गांधी (३०४) लक्ष्मी रवींद्र गादिया (३१६) असे एकुण तेरा उमेदवार विजयी झाले आहेत दि २९ रोजी सकाळी नऊ वाजता मतदानास सुरवात झाली होती तर सायंकाळी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाली दि ३० रोजी सकाळी सहा वाजता मतमोजणी संपली ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या वेळी पोलीस कर्मचारी प्रवीण इंगळे अजय साठे नासीर खान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here