जामखेड येथे काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये झाल्या हजारो महीला सहभागी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड मध्ये महीला झाल्या आक्रमक
जामखेड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड शहरातुन मराठा क्रांती मोर्चा महीला विभाग यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. या कॅन्डल मार्च मध्ये हजारो महीलांनी हातात मेन बत्ती पेटवून शहरातुन कॅन्डल मार्च काढत मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जामखेड मध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे या साखळी उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जामखेड तालुक्यात देखील प्रवेश बंदी घातली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र अजुनही सरकारला जाग आली नाही याच अनुषंगाने आज सायंकाळी जामखेड शहरातुन जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा महीला विभागाच्या वतीने हजारो महीलांच्या वतीने आज दि 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता जामखेड शहरातुन कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.
सायंकाळी हजारो महीला व मुली जामखेड तहसील कार्यालयासमोर जमा झाल्या होत्या. यावेळी या सर्व महीलांनी हातात मेणबत्ती पेटवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा दिल्या. यानंतर हा कॅन्डल मार्च जामखेड तहसील कार्यालया समोरुन बीड रोड, जयहिंद चौक, मेन रोड, संविधान चौक, खर्डा रोड, खर्डा चौक मार्गे पुन्हा तहसील कार्यालयाकडे आला.
महीला या तहसील कार्यालयासमोर आल्या नंतर सर्व महीला व मुलींनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत सरकारचा निषेध केला. यावेळी उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली. शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here