घर चालवणारी महीला राजकारण पण संभाळु शकते-सुकन्या कुलकर्णी – मोने
अमित चिंतामणी यांच्या कोजागिरी पौर्णिमा उत्सवास महीलांचा प्रचंड प्रतिसाद
प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्ही अभिनय क्षेत्रात भरारी घेतली आहे. मराठी सिनेमा लावण्यासाठी प्रेक्षकांनी आग्रह केला पाहिजे, मराठी चित्रपट थेटर मधेच पहा त्यामुळे त्याशिवाय मराठी चित्रपटांचे दिवस येणार नाहीत. महीलांशी बोलताना सांगितले की आजची महीला घर चालवते तीच महीला राजकारण पण संभाळु शकते असे मत सुकन्या कुलकर्णी – मोने यांनी व्यक्त केले.
बाईपण भारी देवा फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने व शिल्पा नवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमे निमित्त जामखेडमध्ये नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा उत्सवा साजरा करण्याचे नववे वर्षे आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या आध्यक्ष
माजी मंत्री व आ. प्रा राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे, प्रांजलताई चिंतामणी ,अंजलीताई चिंतामणी, अर्चनाताई राळेभात, माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर, भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, सभापती शरद कार्ले, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवक बिबीशन धनवडे, मंगेश (दादा) आजबे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मनोज कुलकर्णी, विनायक राऊत, जमिरमाई बारुद, ऑड प्रविण सानप, डॉ अल्ताफ शेख, केदार रसाळ, सुरेश पवार, नंदु गोरे, सचिन घुमरे, प्रविण चोरडीया, अभिजीत राळेभात, संतोष गव्हाळे सह प्रचंड संख्येने महीला उपस्थित होत्या.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आ. प्रा राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे बोलताना म्हणाल्या की आम्ही गुराळ गाळलं पण ते जनतेच्या विश्वासाचे गाळले आहे. आम्ही शेतकरी आहोत त्यामुळे ऊस आणि गुराळ दोन्हीची माहिती आहे. पण जे कधी गुराळ गाळले का असे म्हणणारे कर्जत जामखेड मतदारसंघात मोठे कारखाने विकत घेऊन धंदे वाढवत आहेत असा टोला आ. रोहित पवार यांचे नाव न घेता सौ.आशाताई शिंदे यांनी लावला.
माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की नगरसेवक अमित चिंतामणी यांनी असेच सामाजिक कार्य चालू ठेवुन गोरगरिब जनतेची सेवा करावी, अमित चिंतामणी यांना राजकारणात काही अडचण येणार नाहीत कारण चिंतामणी यांनी आपला प्रभाग मलबार हिल सारखा पक्का बनवला आहे.
नऊ वर्षा पुर्वी सुरु करण्यात आलेल्या या कोजागिरी उत्सवास प्रतिसाद मिळत आहे. असेच सहकार्य करुन पुढील वर्षी कार्यक्रम आनखी कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे अशीच साथ कायमस्वरूपी तुम्ही द्यावी असे मत नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here