नगर-जामखेड महामार्गावर खाजगी बस पलटी, ७ प्रवाशांचा मृत्यू, दहा ते बारा जण गंभीर जखमी
दौलवडगाव येथे रुग्णवाहिका व मालवाहतूक ट्रक यांच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
नगर जामखेड महामार्गावर खाजगी बस पलटी होऊन एकुण सात जणांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना जामखेड पासून पाच ते सहा कीमी आंतरावर आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ घडली आहे. जखमींना तातडीने जामखेड, नगर व आष्टी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की काल रात्री मंबईहुन बीडकडे एन. एल. ०१ बी. २४९९ या क्रमांकाची खाजगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस आज २६ ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता नगर जामखेड महामार्गावरील आष्टी तालुक्यातील हरीणारायण आष्टा फाटा या ठीकाणी आली आसता अचानक बस चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले व ही गाडी महामार्गावरील एका पुलाला धकडुन रस्त्यावरच पलटी होऊन दोनशे फुट पुढे घसरत गेली.
या आपघातात सात जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला आसुन दहा ते बारा जण गंभीर जखमी तर पंचवीस ते तीस जण कीरकोळ जखमी झाले आहेत. मयत व जखमींची नावे अद्याप मिळु शकेलेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच आ. सुरेश (आण्णा) धस यांनी घटनास्थळी धाव घेतली व परीस्थितीची पहाणी करत मदत केली. या नंतर आपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, माजी सरपंच सुनिल कोठारी, संदेश कोठारी, आमोल गिरमे, गणेश डोंगरे, चिंचपूर चे सरपंच ढवळे मेजर, हरीणारायण आष्टा येथिल सरपंच पठाडे, जामखेड चे वसीम सय्यद, गणेश बांदल, प्रविण उगले, आ. रोहित पवार यांचे स्वीसहाय्यक विनय डुकरे, यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. घटनास्थळी तातडीने पंधरा रुग्णवाहिका व दोन जेसीबी पाचारण करण्यात आल्या होत्या. जेसीबी च्या सहाय्याने रस्त्यावर आडवी पडलेली खाजगी बस बाजुला घेण्यात आली व नंतर वाहातुक सुरळीत करण्यात आली.
दौलवडगाव येथे रुग्णवाहिका व मालवाहतूक ट्रक यांच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगर येथे पेशंटला घेऊन जात असताना दौलावडगाव येथे रुग्णवाहिका व ट्रक यांचा रात्री १० वा. दरम्यान अपघात झाला यामध्ये सांगवी पाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के ( वय ३८) आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे रा. धामणगाव व अन्य २ जण असे एकुण ४ जणांचे जाग्यावर निधन झाले आहे तरी एक जखमीवर उपचार चालू आहे. रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते. आष्टी तालुक्यातील दोन्ही आपघात एकुण ११ जणांचा मृत्यू झाला आसल्याची माहिती मिळाली आहे.