‘आरंभ’ च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू – खा डॉ सुजय विखे पाटील

जामखेड प्रतिनिधी

समाजात बदल घडविण्याची ताकद युवकांमध्ये असते समाजहिताचे काम डोळ्यासमोर ठेऊन जामखेड शहरातील युवकांनी एकत्र येऊन आरंभ फाउंडेशनची स्थापन करून हि कौतुकास्पद बाब असून आगामी काळात मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आरंभ फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उमे राहू असे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

विजयादशमीच्या औचित्य साधून आरंभ फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण शुभारंभ खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते कोर्ट रोड येथे करण्यात आला यावेळी रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्करराव मोरे,डॉ सुरेश काशीद,भाजपा नेते रवींद्र सुरवसे,भाजपचे शहराध्यक्ष अभिजित राळेभात,नगरसेवक सोमनाथ राळेभात,अमित चिंतामणी,पवन राळेभात,मोहन पवार,मनोज कुलकर्णी,समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे,शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद,मनसे नेते लक्ष्मणराव कानडे,स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे,,प्रहारचे तालुकाध्यक्ष नयूम सुभेदार,राष्ट्रवादीचे नेते रमेश आजबे,अन्सार पठाण,नाना गव्हाळे,नासिर सय्यद,ऍड प्रमोद राऊत,जैद सय्यद,अरुण मस्के,अरुण वराट,आदींसह आरंभ फाउंडेशनचे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here