कोजागिरी पौर्णिमे निमित्त जामखेडमध्ये नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडियाचे आयोजन
“बाईपण भारी देवा फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने व शिल्पा नवलकर यांची विशेष उपस्थिती
जामखेड प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त जामखेड येथिल नगरसेवक अमित चिंतामणी यांनी महीलांसाठी शनिवार दि २८ रोजी ओपन गरबा दांडियाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी ”बाईपण भारी देवा फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर उपस्थित राहणार आहेत.
या गरबा दांडिया चे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेली गेल्या आठ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया आयोजन केले असून यामध्ये नक्षत्र मंगळागौर ग्रुप, पुणे यांचा गरबा दांडिया कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड येथे वार शनिवार दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी व सौ.प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.