दोन्ही समाजाचे दुखणे एकच, त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा लढा एकत्र लढू -मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील

जामखेड प्रतिनिधी

मराठा व धनगर कोण लहान व कोण मोठे हे मी मानत नाही, दोन्ही समाजाचे दुखणे एकच आहे. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा लढा एकत्र लढू, आरक्षणप्रश्री घराघरात जा, हा लढा आणखी तीव्र करावा. मग आरक्षण कसे मिळत नाही तेच बघु असे आवाहन मराठायोध्दा मनोज जरांगे यांनी चौंडी येथे धनगर बांधवांना केले आहे.

यशवंतसेनेतर्फे चौंडी येथे धनगर आरक्षणप्रश्री दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अथिती म्हणून जरांगे यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. माजीमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार प्रा राम शिंदे, माजी आमदार रामहरी रूपनवर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, सामाजिक कार्यकर्त्या सुशिला मोराळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संभाजी शिंदे, डाॅ.शिवाजी राऊत, उज्वला हाके, उत्तम पडळकर, ॲड. दिलीप येडतकर, यशवंतसेने अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितीन धायगुडे, शांतीलाल कोपनर, प्रा शिवाजी बंडगर यांच्यासह मोठया संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.

यावेळी जरांगे म्हणाले, आरक्षणप्रश्री धनगराच्या शेवटच्या लोकापर्यंत लाट गेली तर ,कोणीच रोखु शकत नाही. मराठा धनगर लहान मोठा भाऊ मानत नाही.आपण एकच आहोत. तुम्हाला तुमच्या लेकराबाळाच भविष्य चांगल करायच असेल तर पेटुन उठायला लागेल. मी तुमच्या ताकदीने पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण मिळेपर्यंत छाताडावर बसणार, पण आरक्षण सोडणार नाही. मी जातवान शेतक-याचा पोरगा आहे. आपल्या लेकराबावाला न्याय द्यायचा असेल, आरक्षण मिळवावेच लागेल. आपले बांधव द-या खो-यात मेंढर चारायची. आमच्या मराठा समाजाने काबाडकष्ट करायचे आणि मुल शिकवायची एवढेच आजपर्यंत केले. राजकारण डोक्यात ठेवुण काही केल तर आरक्षणच मिळणार नाही. जातीची गद्दारी करणारी माझी औलाद माझी नाही. मराठा आरक्षणप्रश्री समिती हैद्राबादला जाती आणि परत येते नेमका काय अभ्यास करतीय माहित नाही. सरकार दर चार दिवसाला पर्याय सांगा म्हणतय.

आमदार प्रा राम शिंदे म्हणाले, धनगरांना राज्यात एनटीमध्ये,देशात ओबीसीमध्ये आणि घटनेत एसटीमध्ये आरक्षण आहे. आरक्षणाच्या दृष्टीने सरकारकडून ज्या गतीने हालचाली करायला पाहिजे होत्या केल्या नसल्याने या मेळाव्याची गरज पडली असल्याचे सांगत ते म्हणाले, समाजाच्या हितासाठी धनगर सारा एक हा उद्देश ठेवुन आरक्षण उभे गेले तर नक्कीच यश मिळेल. समाजकारण आणि राजकारणात गल्लत झाली की गफलत होते. धनगर समाजात मनोज जरांगे पाटील का निर्माण होत नाही.अण्णा हजारे नंतर जर कोणाच्या आंदोलनाची देशात चर्चा झाली असेल, तर ते मनोज जरांगे पाटील आहेत.सत्तेला वाकावायची ताकद जरांगे पाटलांच्यामध्ये असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजीमंत्री अण्णासाहब डांगे, यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, माजी आ रामहरी रूपनवर, गणेश हाके ,सुरेश बंडगर, अण्णासाहेब रूपनवर यांची भाषणे झाली. प्रास्तविक नितीन धायगुडे यांनी केले. तर आभार किरण धालपे यांनी मानले.

चौकट

५० दिवसात आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावला नाही, तर गाठ धनगरांशी आहे.
——————————————
यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले, धनगर आरक्षणप्रश्री सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर.आरक्षणाचा लढा तीव्र करणार आहे.आता ५० दिवसात आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावला नाही, तर गाठ धनगरांशी आहे. असा इशारा त्यांनी सरकारला दिला. माळी, धनगर, वंजारी या पुर्वीच्या’ माधव ‘ पॅटर्नप्रमाणे आता म ध (मराठा – धनगर) पॅटर्न राज्यात राबवण्याचा निर्धार यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here