पालकत्व घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. सागर शिंदे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप; या वर्षीचे सातवे वर्षे
जामखेड प्रतिनिधी
आरोग्य बरोबरच सामाजिक कार्याचा वसा घेतलेले जामखेड येथिल प्रसिद्ध गोल्ड मेडलिस्ट डेंटल डॉक्टर डॉ सागर शिंदे यांनी पालकत्व घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे त्यांचे या वर्षीचे सातवे वर्ष आहे.
जामखेड तालुक्यात प्रसिद्ध गोल्ड मेडलिस्ट डेंटल डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉ सागर शिंदे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर असल्यामुळे दिनदुबळे अनाथ विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक खर्च , गणवेश, दप्तर, सर्व शैक्षणिक साहित्य व वर्षभरात येणाऱ्या सर्व परीक्षांचे फी ते स्वतः देत असतात.
गेल्या सात वर्षांपासून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील 86 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच या शैक्षणिक वर्षातील 12 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व आहे व परीक्षा फी दहा हजार रुपयांचा चेक विद्यालयाकडे सुपूर्त केला.
अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून दर वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत आहेत. डॉ शिंदे हे नेहमी सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन कार्य करत असतात यांच्या कार्याबद्दल विद्यालय कडून त्यांचा सन्मान करण्यात आला व सर्व मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्रजी कोठारी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, स्कूल कमिटीचे सदस्य हरिभाऊ बेलेकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर (आबा) राळेभात, उद्योजक विनायक राऊत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, प्रा राहुल अहिरे, बिबीशन परखड, प्राचार्य मडके बी के, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, रघुनाथ मोहोळकर साळुंखे बी एस, एन सी सी ऑफिसर मयूर भोसले, सोमीनाथ गर्जे, संतोष पवार, प्रा विनोद सासवडकर, प्रा केलास वायकर, ज्योती पालकर, सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांची समाजसेवा
हेल्थ दातांचा दवाखाना सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉक्टर सागर शिंदे आणि मयुरी शिंदे यांनी अनेक फ्री डेंटल चेकअप घेतले आहेत. आज पर्यंत त्यांनी बारा फ्री डेंटल चेक अप कॅम्प आणि जामखेड मधील पाच शाळांना डेंटल कॅम्प आणि दवाखान्या मार्फत मार्गदर्शन आणि टूथपेस्ट आणि ब्रश दिलेली आहेत. लहान मुलांमध्ये दात स्वच्छ ठेवण्याची भावना रुजावी आणि त्यांना सवय लावावी यासाठी हे कॅम्प घेतले जातात.
एक सेवाभावी उपक्रम
मागील सात वर्षापासून जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय येथील गरीब व अनाथ मुलांना त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांच्या शिक्षणाचा भार यांनी उचललेला आहे. आत्तापर्यंत शेकडो अनाथ मुलांना डॉक्टर शिंदे यांनी मदत केलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि आई-वडिलांनी दिलेल्या समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवत आहेत.