जामखेडचा रुबाब वाढवण्यासाठी एवन टेक्सटाईल सज्ज

चारमजली एवन टेक्सटाईलचा शुभारंभ विजयादशमी दिवशी होणार

जामखेड प्रतिनिधी

जामखेड करांचा रुबाब वाढवण्यासाठी व संपुर्ण कुटुंबाचं वस्त्रदालन म्हणून ओळख होणार आसलेल्या जामखेड शहरातील नव्याने सुरू होणाऱ्या एवन टेक्स्टाइल या चारमजली भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ विजयादशमीच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच्या हस्ते होणार आहे.

याबाबत माहिती आशी की जामखेड शहराच्या वैभवात भर टाकणारे भव्य दिव्य एवन टेक्सटाईल मध्ये कॉलीटी, व्हरायटी, डिझाईन, फिटिंग सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होत आहे भव्य अशा एवन टेक्सटाईल चा शुभारंभ विजयादशमीच्या दिवशी अध्यात्मिक, राजकीय व सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या हस्ते होत आहे. तरी या शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित रहाण्याचे अवहान बोराटे व राऊत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

एवन टेक्सटाईलचा भव्य शुभारंभ सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार सुरेश धस, अखिल भारतीय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, प. पू. पांडुरंग शास्त्री देशमुख, हभप रामकृष्ण महाराज रंधवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

वै.विठ्ठलराव (आण्णा) राऊत आणि आदरणीय श्री साधू (नाना) बोराटे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या. एवन टेक्सटाईलच्या रूपाने जामखेड शहरात भव्य दिव्य वस्त्र दालन होत आहे. बोराटे व राऊत परिवाराने जामखेड शहरात पहिल्या संपूर्ण वातानुकूलित चार मजली भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केला आहे. यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि दर्जेदार वस्त्रसेवा पुरविण्यासाठी बोराटे व राऊत परिवाराने नवा प्रवास सुरू केला आहे. तरी विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वस्त्ररूपी सोने लुटा आणि आपल्या परिवारास नाविन्यपूर्ण वस्त्रांची भेट द्या असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here