नगरसेवक बिबिशन धनवडे यांच्या जामखेड मधिल पहील्या एस एस मोबाईल शॉपीचा उद्घाटन शुभारंभ संपन्न…

नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद…

जामखेड प्रतिनिधी

एस एस मोबाईल’या महाराष्ट्र आणि गोवा मधील नंबर वन मोबाईल स्टोरच्या जामखेड मधील नगरसेवक बिबिशन धनवडे यांच्या पहिल्या एक्सपिरियन्स स्टोर चा भव्य शुभारंभ नुकताच विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शनिवार दि. २१ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते एस एस मोबाईल शॉपीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, मंगेश (दादा) आजबे, डॉ. भगवान मुरूमकर, दिलीप गुगळे, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेश मोरे, संध्याताई सोनवणे, प्रा. कैलास माने, विकी सदाफुले, विकी घायतडक, बापुराव ढवळे, प्रा. लक्ष्मण ढेपे, बिभीषण धनवडे, रमेश वराट, लहू शिंदे, ज्ञानेश्वर झेंडे, संतोष फिरोदिया, महेश निमोणकर, दिपक महाराज गायकवाड, गणेश डोंगरे, गोरख घनवट, सुनील जगताप, सरपंच भिमराव कापसे, जयसिंग उगले, दादासाहेब (हवा) सरनोबत, करण ढवळे, हनुमंत पाटील, पप्पू काशिद यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दत्ता वारे, शरद कार्ले, राजेंद्र कोठारी, डॉ. भगवान मुरूमकर, प्रा. मधुकर राळेभात यांनी आपले विचार व्यक्त केले व बिभीषण धनवडे यांच्या एस. एस.मोबाईल शाँपीला शुभेच्छा दिल्या.

एस. एस. मोबाईल शाँपी ही भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी आहे. एका खरेदीवर अनेक डिस्काउंट आँफर आहेत. आज तर विना व्याजदराने मोबाईल मिळणार आहे. ही शाखा जामखेड शहरात सुरू झाल्याने जामखेड शहराच्या वैभवात भर पडणार आहे असे सर्वच वक्तत्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here