नगरसेवक बिभिषण धनवडे यांच्या कडुन महीलांना मोहटादेवी दर्शन

जामखेड प्रतिनिधी

शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त शहरातील जगदंबा माहिला मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक बिभीषण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील महीलांसाठी मोफत मोहटा देवी दर्शन घडवुन आणले.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये बिबीशन धनवडे यांचे सामाजिक कार्या बरोबरच धार्मिक कार्यात देखील सक्रिय आहेत. नवरात्रात उत्साहा निमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा महीला मंडळ गेल्या वीस वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करते. नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे हे गेल्या ६ वर्षांपासून शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मोहटादेवी दर्शन सोहळ्याचे आयोजन करतात. प्रभाग क्रमांक १५ मधिल २०० ते २५० माहिलांना मोहटादेवी दर्शन घडणार तसेच माहिला व भाविकांना दर्शनासाठी घेऊन जातात.

सालाबादप्रमाणे यावर्षी ही प्रभागातील माहिला तसेच भाविकांसाठी मोहटा देवीच्या दर्शनासाठी २० वाहनांची सोय केली होती. याच अनुषंगाने आज बुधवार दि १८ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्या हस्ते नारळ फोडून मोहटादेवी दर्शनासाठी महीला मंडळ रवाना झाले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, सोमनाथ पाचर्णे, संचालक रवींद्र हुलगुंडे, प्रविण चोरडिया, पोपट राळेभात, रमेश वराट दाजी, सोमनाथ राळेभात, ॲड प्रविण सानप, डॉ.अल्ताब शेख, अनिल यादव, गणेश शेठ डोंगरे, उध्दव हुलगुंडे, शिवकुमार डोंगरे, प्रविण बोलभट, विष्णू गंभीरे, विलास मोरे, शुभम धनवडे, शहाजी निमोणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १५ मधील माहिला तसेच भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणण्यासाठी नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष बिभिषण (मामा) धनवडे यांनी मोफत सेवा दिली. या मध्ये साधरण २०० ते २५० महिलांनी मोहटादेवी दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच माहिला भाविकांना नऊ दिवस उपवास असल्याने दुपारी मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here