ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत ग्राहकांचा पुन्हा सुरू झाला ठेवीचा ओघ- व्यवस्थापक सचिन खांडे
ग्राहकांचे प्रेम पाहूण कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे भारावले
जामखेड प्रतिनिधी
मागील दोन दिवसांत जामखेडसह इतर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली होती. यामुळे अनेक ग्राहकांनी ठेवी काढून घेण्यासाठी बँकेत गर्दी केली होती. तेव्हा बँकेतील आपल्या ठेवी सुरक्षित आहेत या अफवांवर विश्वास ठेवू नका, ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकता. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जाव्यात असे आवाहन जामखेड ज्ञानराधा बँकेचे व्यवस्थापक सचिन खांडे यांनी केले होते. तेव्हा पुन्हा ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात बँक यशस्वी झाली असून आज जामखेड शाखेत लाखो रूपयांच्या ठेवी ठेवण्यासाठी ग्राहकांचा पुन्हा ओघ सुरू झाला आहे.
छापा तिरुमलावर गर्दी ज्ञानराधात
सविस्तर माहिती अशी की, तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा पसरविण्यात आल्या आहेत. पण तिरुमला व ज्ञानराधा या वेगवेगळ्या संस्था आहेत फक्त मालक एक आहे.
आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी आज दिवसभर मोठी गर्दी करत आहेत. तुमच्या ठेवी आहेत त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. फक्त गर्दी करू नका. या आवाहनाला ग्राहकांनी प्रतिसाद दिला फक्त शुक्रवारी गर्दी होती शनिवारी व रविवारी बँक चालू ठेवण्यात आली होती लोकांनी ठेवी काढून घेण्यापेक्षा आता परत ठेवी ठेवण्याकडे लोकांना कल वाढला आहे.
ग्राहकांचे प्रेम पाहूण कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे भारावले
तुमच्या सर्वांच्या बळामुळे ज्ञानराधा पुन्हा ट्रकवर आली, तुमचे हे बळ असेच माझ्या पाठीशी राहू द्या, तुमच्या, ग्राहकांच्या विश्‍वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही तुमच्या सर्वांच्या बळामुळे ज्ञानराधा पुन्हा ट्रकवर आली, तुमचे हे बळ असेच माझ्या पाठीशी राहू द्या, तुमच्या, ग्राहकांच्या विश्‍वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. आयकर विभागाने सुरु केलेले सर्च संपल्यानंतर कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी रविवारी रात्री आठ वाजता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना ते चांगलेच भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here