ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत उठलेल्या अफवेवर विश्वास ठेवू नका
सर्वाच्या ठेवी सुरक्षित आहेत काळजी करु नका – सचिन खांडे
जामखेड सह इतर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली जात आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, जामखेड व इतर सर्वच ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकता. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जाव्यात असे आवाहन जामखेड ज्ञानराधा बँकेचे व्यवस्थापक सचिन खांडे यांनी केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा पसरविण्यात आल्या आहेत. पण तिरुमला व ज्ञानराधा या वेगवेगळ्या संस्था आहेत फक्त मालक एक आहे.
आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी आज दिवसभर मोठी गर्दी करत आहेत. तुमच्या ठेवी आहेत त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि तुम्ही जेव्हा बँकेमध्ये काढून घेण्यासाठी येताल तेव्हा त्या ठेवी आपणास सन्मानाने परत मिळतील.
बँक सुस्थितीमध्ये आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, ठेवीदारांना एकच विनंती आहे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका, शिस्तीमध्ये काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा, आपल्या ठेवी काढून घेताना कोणतीही आडकाठी मध्ये येणार नाही हा विश्वास बँकेचे व्यवस्थापक सचिन खांडे यांनी दिला.
काय म्हणाले? कुटे ग्रृप चे मालक सुरेश कुटे……
जामखेड सह जालना, बिड, नगर, परभणी जिल्ह्यातील कोणत्याही शाखेतील ग्राहकांना त्रास होऊ देणार नाही. फक्त ग्राहकांनी नेहमी प्रमाणे आपले व्यवहार चालू ठेवावेत. मी बीडमध्येच आहे. आयकर
विभागाच्या चौकशी नंतर मी बाहेर आल्यानंतर प्रत्येक शाखेत येऊन भेट देणार आहे व बोलणार आहे. पुढची अनेक वर्ष आपणास सोबत काम करायचे आहे. आजवर जशी सेवा दिली. तशीच सेवा पुढे द्यावी ही विनंती. या काळात कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या सर्व शाखेला सहकार्य करा असे
आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन सुरेश कुटे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here