दसर्‍याच्या दिवशी चौंडीत धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने होणार महामेळा
महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथिल महामेळाव्यास उपस्थित रहावे – राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले
जामखेड प्रतिनिधी
चौंडी येथिल उपोषण सोडुन १४ दिवस झाले असले तरी सरकारने कुठलीही ठोस भुमिका व दखल घेतली नाही त्यामुळे हे सरकार धनगर समाजाची क्रुर थट्टा करत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चौंडी येथे दसर्‍या दिवशी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी करावी यासाठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. आशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी मंगळवार दि १० रोजी चौडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत तब्बल २१ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले होते. यावेळी सरकारने ५० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र १५ दिवस होउनही अद्याप सरकारने आरक्षणा बाबत कसल्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथिल जन्मगावी समस्त धनगर समाजाच्या वतीने दसर्‍याच्या दिवशी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दोडतले म्हणाले की राज्यभरातुन सर्व धनगर बांधवांनी एकदिवस समाज्यासाठी एक दिवस आरक्षणासाठी हे घोषवाक्य घेऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या चौडी येथे २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवहान यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे २१ दिवस आमरण उपोषण करण्यात आले मात्र या उपोषणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर बांधवांनी याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे.
या देशातील चौंडी हे महत्त्वाचे शक्तिपीठ आहे ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव आहे. याठिकाणी धनगर आरक्षण महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे धनगर आरक्षणाचे सिमोल्लंघन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचे आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब दांगडे म्हणाले की सरकारने पन्नास दिवसांचा वेळ मागितला आहे. सरकार काय करतंय हे सध्या आम्हाला कळायला मार्ग नाही, सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. शासनाने निमंत्रण दिले होते ती बैठक मंबई याठिकाणी आमची झाली. शासनाने लेखी आश्वासन दिले आसले तरी १५ दिवस होऊनही सरकारने कसलीही दखल घेतली नाही त्यामुळे दसर्‍या दिवशी महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे उपस्थित रहावे सरकारला पिवळे वादळ दिसले पाहिजे असेही दांगडे यांनी सांगितले.
यावेळी चौंडी येथिल पत्रकार परिषदेत दरम्यान यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, नितीनदादा धायगुडे, बाळा गायके, स्वप्निल मेमाणे, दिलीप गडदे, शांतीलाल नाना कोपनर, दत्ताजी काळे, किरण धालपे, सह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here