तेलंगशी ग्रामपंचायत पुन्हा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताब्यात..
सरपंच पदी सौ. कविता दिगंबर ढाळे यांची बिनविरोध निवड…
जामखेड प्रतिनिधी
तेलंगशी ग्रामपंचायतच्या चुरशीने झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ कविता दिगंबर ढाळे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी तेलंगशी गावात मोठा जल्लोष होऊन त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मागील निवडणुकीत आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बहुमत होऊन 9 पैकी 9 ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले होते. त्यावेळी अडीच वर्षे सरपंच पदासाठी छगाबाई जाधव यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी ठरल्याप्रमाणे पुढील अडीच वर्ष सरपंच पदासाठी सौ. कविता दिगंबर ढाळे यांचे नाव निश्चित केले होते. सरपंच छगाबाई जाधव यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्याप्रमाणे सरपंच तेलंगशी गावच्या सरपंच पदाची निवडणूक 4 ऑक्टोबर 2023 रोजी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.
परंतु या 9 पैकी 4 ग्रामपंचायत सदस्यांनी विरोधी भूमिका घेतली त्यांनी सरपंच पदासाठी श्रीमती कमलबाई वायभासे यांचे नाव निश्चित केले व ते 4 ग्रा.पंचायत सदस्य घेऊन सहलीला रवाना झाले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली, तर भरत ढाळे यांनी सरपंच पदासाठी 5 ग्रामपंचायत सदस्य अज्ञात स्थळी रवाना केले होते, अत्यंत चुरशीची निवडणूक होत असताना तेलंगशी गावात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले होते, परंतु मतदाना दिवशी भरत ढाळे समर्थक कविता दिगंबर ढाळे यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी भरण्यात आला तर विरोधी गटाने सरपंच पदासाठी बहुमत नसल्याचे कारण देऊन अर्ज भरला नाही, त्यामुळे तेलंगशी गावच्या सरपंच पदासाठी सौ. कविता दिगंबर ढाळे यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी नंदू गव्हाणे यांनी जाहीर केली.
त्यानंतर तेलंगशी गावात मोठा जल्लोष करण्यात आला तर फटाक्यांची व तोफांची आतिषबाजी करण्यात आली. अशा पद्धतीने चुरशीच्या झालेल्या तेलंगशी ग्रामपंचायत ही आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ताब्यात आल्याने सरपंच सौ. कविता ढाळे यांचे खर्डा, तेलंगशी परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सरपंच पदासाठी हनुमंत जायभाय, महाराज जायभाय, मुकेश मोरे, तुकाराम ढाळे, अण्णा काळे, सिद्धेश्वर ढाळे शंकर डास, ज्ञानेश्वर ढाळे, बळीराम ढाळे, सोमा मोरे, अश्रू मोरे, दिलीप मोरे, सुग्रीव मोरे, सुधीर ढाळे, नंदू ढाळे, अशोक ढाळे, शिवाजी बावणे, बाळासाहेब ढाळे,रेवणनाथ ढाळे, प्रवीण पवार, सहदेव जायभाय, सागर जायभाय, रमेश जायभाय, तुकाराम जाधव, विजय जाधव इ. सह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. तर तेलंगशी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुन्हा ताब्यात येण्यासाठी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वारे, मधुकर (आबा) राळेभात, सूर्यकांत (नाना) मोरे, विजयसिंह गोलेकर, रमेश (दादा) आजबे, रामहरी गोपाळघरे, हनुमंत बारगजे, चंद्रकांत गोलेकर, सरपंच सागर कोल्हे, बाळासाहेब खैरे, सिद्धेश्वर लटके, निलेश पवार व आमदार रोहित दादा पवार संपर्क कार्यालयातील कर्मचार्यांनी सहकार्य केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर साहेब व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.