सहकार महर्षी स्व.जगन्नाथ (तात्या)राळेभात यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त दोन दिवस कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील गोरगरीब शेतकर्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सहकार महर्षी स्व.जगन्नाथ (तात्या )देवराव राळेभात पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने दोन दिवस कीर्तन सोहळ्याचे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या किर्तन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधिर राळेभात यांनी केले आहे.
स्वर्गीय सहकार महर्षी जगन्नाथ (तात्या)राळेभात हे मागिल पंधरा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. जामखेड तालुक्यातील सोसायट्यांवर त्यांचे वर्चस्व होते. जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधिर राळेभात यांचे ते वडील होते.
सहकार महर्षी स्व.जगन्नाथ (तात्या) राळेभात यांचे दि २७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथम पुण्यस्मरणा आहे. या निमित्ताने मंगळवार दि २६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ ते १० या वेळी ह.भ.प.रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक (नागपूरकर) यांचे कीर्तन होणार आहे. तर बुधवार दि २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ ) यांचे कीर्तन होणार आहे. दि २६ व २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले दोन्ही कीर्तनाचे स्थळ बीड रोडवरील आदित्य मंगल कार्यालय या ठिकाणी आसुन तालुक्यातील महीला व नागरिकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधिर राळेभात यांनी केले आहे.