सर्वोत्कृष्ट व शिस्तप्रिय गणेश मंडळांसाठी मोहन पवार यांच्यावतीने बक्षिसे जाहीर, सहभागी होण्याचे आवाहन केले आवाहन
जामखेड प्रतिनिधी
माजी नगरसेवक मोहन पवार, मातोश्री क्रीडा संकुलन व मातोश्री लाल आखाडा यांच्यातर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या अंतर्गतच आगामी गणेश उत्सवानिमित्त गणेश मंडळांना प्रोत्साहन व सन्मान मिळावा यासाठी त्यांच्या वतीने ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
जामखेड शहरातील जी गणेश मंडळे डिजे विरहित मिरवणूक, पारंपरिक देखावे, महिलांची व्यवस्था, गणपती उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था, अशा विविध अटी व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करणाऱ्या जामखेड शहरातील गणेश मंडळांना मोहन पवार मित्र मंडळाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार असून रोख रक्कम, ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जामखेड शहरातील जी गणेश मंडळ शासनाचे नियम अटी पाळून उत्कृष्ट देखावा करतील त्यांच्यासाठी मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडा यांच्यातर्फे बक्षिसे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असलेले हे दुसरे वर्षे आहे.
नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडाचे संस्थापक अध्यक्ष असून ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवतात. मागील वर्षीही त्यांनी हा उपक्रम राबविला होता. डिजे विरहित मिरवणूक, पारंपरिक देखावे, महिलांची व्यवस्था, गणपती उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था, अश्या विविध अटी व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करतील त्यांना बक्षीसे दिली जाणार असल्याचे मोहन पवार यांनी यावेळी सांगितले.