चौंडीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी केले सामुहिक मुंडन
आजपासून उपोषणकर्त्यांने पाणी पिण्याचे केले बंद
जामखेड प्रतिनिधी
चौंडी येथिल आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस उजाडला आसुनही अद्याप या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेतली नाही. दोन दिवसात बैठकीचे आश्वासन देऊनही बैठक घेतली नाही. याच निषेधार्थ चौंडी येथे उपोषण कर्त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिरुर तालुक्यातील धनगर बांधवांनी उपोषणास्थळी मुंडण करुन सरकारचा जाहीर निषेध केला.
गेल्या पंधरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. या उपोषणास गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून पाठींबा वाढत आहे.
याच अनुषंगाने पाठींबा देण्यासाठी बीड जिल्ह्य़ातील शिरुर तालुक्यातील काही धनगर बांधव चौंडी येथिल उपोषणास्थळी पाठींबा देण्यासाठी आले होते. या वेळी शिरूर तालुक्यातील कासारी येथील सरपंच अंकुश शेळके (नांदवली), सुशिल शेळके, कल्याण शेळके, गणेश शेळके, नारायण व्हटकर, यांच्यासह ५० पेक्षा जास्त तरूणांनी सरकारचा निषेध व उपोषणाला पाठिंबा म्हणून उपोषणस्थळी सामूहिक मूंडण केले.
चौडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अमरण उपोषण गेल्या १५ दिवसापासून सुरू आहे. सरकारचे प्रतिनिधी मंत्री गिरिश महाजन यांनी मागितलेल्या दोन दिवसाची मूदत संपली. सरकारकडून आतापर्यंत कसलाही निर्णय कींवा निरोप आला नाही. दि २० रोजी संध्याकाळपर्यंत काही निर्णय घेतला नाही तर सरकारबरोबर चर्चेची दार बंद करू असा इशारा उपोषणकर्ते यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.
धनगर आरक्षणासाठी चौडीतील उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी जलत्याग केला आहे. दूसरे उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर यांच्यावर पुण्यातील ससुन रुग्णालयातं उपचार सुरू आहेत. मात्र रूग्णालयतही त्यांचे उपोषण सुरू केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातुन धनगर समाज बांधव चौडी येथे जाऊन उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्रत दि २० रोजी विविध २५ ठिकाणी धनगर बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here