विजेच्या प्रश्नी सुरू केलेले अंकुश ढवळे यांचे उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कंपनीच्या डिसाळ धोरणामुळे विजेच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिंपरखेड, हळगावसह पंचक्रोशीतील २० गावांच्या शेतीला ८ तास वीजपुरवठा मिळावा व सिंगल फेज कायम सुरू राहावे, या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांनी हळगाव येथे दि १७ रोजी उपोषण सुरू केले होते. तहसीलदार व महावितरण अधिकारयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
अरणगाव पंचायत समिती गणात मागील दहा वर्षांपासून शेतीपंपासाठी व घरगुती सिंगल फेजसाठी वीजवितरण एक दिवसाआड होत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. शेतीला आठ तास व सिंगल फेज चोविस तास वीज मिळण्यासाठी हळगाव येथे रविवारी अंकुश ढवळे व शेतकरी उपोषणास बसले होते. अंकुश ढवळे यांच्या निवेदनाची दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे,आ. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे, आ. रोहित पवार यांनीही घेतली. त्यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांना सुचना केल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे महावितरणचे किसन चेचर यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
या गावांना आठ तास अखंडित सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी, चोंडी येथे नवीन ३३/११ उपकेंद्र आरडीएसएस योजनेंतर्गत प्रस्तावित
आहे. तसेच शेती वाहिनीचे भारनियमन ठरविणे हा कंपनीचा धोरणात्मक निर्णय आहे. तो या कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाही. आपल्या मागणीप्रमाणे वरील दोन्ही बाजूस आठ तास वीजपुरवठा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी उपसभापती अंकुश ढवळे, शेतकरी सखाराम भोरे, रविराज ढवळे, किसनराव ढवळे, शिवाजीराव ढवळे, नवनाथ ढवळे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत निकम, पाराजी ढवळे, आनंदराव भापकर, विशाल गाडेकर, महादेव ढवळे, दीपक ढवळे, महेश ढवळे सुरेश ढवळे, पंडित ढवळे, अक्षय आमटे, राहुल पुराणे, बबन पाचरणे, महादेव रधवे, सुरेश कांकरिया, शहाबूद्दीन शेख, रवी पुराणे, दादासाहेब पुराणे, बाळासाहेब पुराणे, हसन शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here