महाराष्ट्रातील धनगर बांधव करणार दि २० रोजी खंबाटकी घाटात रास्तारोको – माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले
चौंडी येथिल राज्यव्यापी बैठकीत ठरली रास्तारोको आंदोलनाची दिशा
जामखेड प्रतिनिधी
यशवंत सेनेच्या कै. बी के कोकरे यांनी धनगर आरक्षणाची ज्योत पेटवली त्याच घाटात खंडाळा घाटात पेटवलेल्या ज्योतीचे वणव्यामध्ये रुपांतर होणार आहे. याच अनुषंगाने येणाऱ्या २० तारखेला खंबाटकी घाट ता.खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या वतीने भव्य रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय चौंडी येथिल राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला.
चौंडी येथिल गेल्या बारा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव एकवटला आहे. यासाठी आज रविवार दि १७ रोजी धनगर समाजातील सर्व आजी ,माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी चोंडीत आयोजित केली होती. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले हे बोलत होते.
पुढे बोलताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले म्हणाले की ही लढाई फक्त यशवंत सेनेची नाही हे आंदोलन धनगर समाजाच्या येणार्या पुढील पिढीसाठी आहे. ही लढाई समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक हितासाठी आहे. चौंडी येथिल पवित्र ठिकाणी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी हे उपोषण सुरू आहे. हा देश घटनेवर चालत असेल तर ४७ जातींना अदिवासींची सवलत मिळते मग धनगर समाजाला का मिळत नाही
आमचा एक उपोषण करणारा सिंह मरणाच्या दारात आहे. हा लढा आजच्या पुरता नाही धनगर समाज्याच्या हाती काही तरी पडल्या शिवाय माघार घेणार नाही. दोन दिवस वाट बघु जर आरक्षणाचा तीढा सुटला नाही तर धनगर बांधवांन कडुन वनवा पेटल्या शिवाय रहाणार नाही. चौंडी येथे उपोषणास बसलेल्या धनगर बांधवांनी आजचा संदेश प्रत्येक गावा गावात घेऊन जावा व आंदोलनाचा लढा महाराष्ट्रात जास्तीत जास्त वाढवा .
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब दांगडे, माजी खा. विकास महात्मे आ. प्रा राम शिंदे,आ. दत्तामामा भरणे, माजी आ. रामहरी रूपनर, गणेश हाके, भाऊलाल तांबडे, नीतीन धायगुडे, सौ.निलम खैरनार, विद्या पोले , हनुमंत पावणे महाराज , किशोर मासाळ, अक्षय शिंदे, सह महाराष्ट्रातील अनेक धनगर संघटनेचे पदाधिकारी व धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलापुर, बीड येथून मोटारकार रँली तर पिंपरी चिंचवडहून पायी रँलीद्वारे उपोषणाला पाठींबा देण्यासाठी धनगर बांधव मोठ्या संख्येने चोंडीला येत आहेत.