किरणा मालाच्या चालत्या टेंम्पोने घेतला पेट, जामखेड खर्डा रोडवरील घटना
जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रस्त्यावरील आजिंक्यतारा हाॅटेल समोर जामखेडहुन वालवड या ठीकाणी कीराणा माल घेऊन जाणार्‍या एका चालत्या टॅम्पोने अचानक पेट घेतला. या घटने मध्ये कीराणा मालाचे व टॅम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेडहुन एम. एच २५ बी ६६८५ क्रमांकाच्या एका टॅम्पोत कीराणा माल घेऊन हा टॅम्पो भुम तालुक्यातील वालवड या ठीकाणी चालला होता. सदरचा टॅम्पो जामखेड खर्डा रस्त्यावरील आजिंक्यतारा हाॅटेल समोरुन जात आसताना या टॅम्पोने अचानक पेट घेतला व आग लागली. आचनक टेंम्पोने पेट घेतल्याने काही समजण्याच्या आतच आगीचे लोळ बाहेर पडु लागले. दोन्ही बाजुने वाहातुक थांबली गेली आगीची तीव्रता लक्षात घेत नगरपरिषदेचे आग्नीशामक ताबडतोब दाखल झाले. तसेच वाहातुक नियंत्रणात आणण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या साह्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी, पोलीस उपनिरीक्षक आनिल भारती, साह्यक फौजदार लहु यादव, पोलीस काँन्टेबल दिनेश गणगे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आग्नीशामक कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, राजु माने तर स्थानिक कार्यकर्ते प्रविण बहीर, भाऊसाहेब तनपुरे, दादासाहेब जगदाळे, दादा बहीर यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.

आग जरी विझवली आसली तरी या घटनेत किरणामालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टेंम्पोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here