आंदोलन पेटले, धनगर बांधवांनी जाळला राज्य सरकारकारचा प्रतिकात्मक पुतळा
पालकमंत्र्यांचा चौंडी दौरा रद्द झाल्याने धनगर बांधव झाले आक्रमक
कर्जत प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपासून चौंडी येथिल उपोषणाची दखल न घेतल्याने तसेच पालकमंत्री यांनी आज चौंडी येथिल दैरा रद्द केल्याच्या निषेधार्थ अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव या ठीकाणी राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला. या वेळी राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच वटहुकुम निघाला नाही तर पुढे महाराष्ट्र उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.
यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. या उपोषणास गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून पाठींबा वाढत आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप या उपोषणाबाबत कसली दखले घेतली नाही. तसेच दहा दिवस होऊनही पालकमंत्री या ठीकाणी फीरकले नाहीत त्यामुळे धनगर समाजाच्या युवक बांधवांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. या नंतर अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव या ठीकाणी राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला. या वेळी राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काल चौंडी येथिल धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी दैरा आयोजित करण्यात आला होता. मात्र सकाळी एन वेळी हा दैरा रद्द झाला. त्याचत सध्या उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे या मुळे सरकारचे मंत्री याठिकाणी फीरकले नाहीत या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला. तसेच राज्य सरकारने पुढे उपोषणाची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here