धनगर आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी जामखेड येथे १६ रोजी चक्काजाम आंदोलन
धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने दिले तहसीलदार यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे अमरण उपोषण उपोषण सुरू आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक या ठीकाणी शनिवार दि १३ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत चे निवेदन जामखेड चे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील १७ टक्के लोकसंख्या असलेल्या धनगर समाज्याला अनुसूचित जमातीत आरक्षणापासुन वंचित ठेवले आहे. यामुळे धनगर समाज्यात तीव्र असंतोष पसरला आहे. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या विषेश अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकुम जारी करावा या मागणीसाठी चौंडी येथे अमरण उपोषण सुरू आहे.
त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण कृती समिती जामखेड यांच्या वतीने शनिवार दि १६ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन आयोजित केले आहे. तरी या रास्तारोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने विकास मासाळ व मोहन (मामा) गडदे यांनी केले .निवेदन देता वेळी कल्याण हुलगुंडे ,कीसन चिलगर पै.सुरज पवार शाम म्हात्रे सागर रीटे अल्ताफ शेख , पै अर्थराज गायकवाड सह अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here