गणेश मंडळांनी सामाजिक सलोखा व आपली संस्कृती टीकुन ठेवावी -अप्पर पो.अधी. प्रशांत खैरे
जामखेड येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न
जामखेड प्रतिनिधी
गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवावेत. सुचनांचे पालन करुन शांततेच्या मार्गाने हा उत्सव साजरा करावा. तसेच गणेश मंडळांनी सामाजिक सलोखा राखावी व आपली संस्कृती टीकुन ठेवावी असे मत अप्पर पोलीस अधीकारी प्रशांत खैरे यांनी जामखेड येथील शांतता कमीटीच्या बैठकीत व्यक्त केले.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने जामखेड तालुका प्रशासनाच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी जामखेड तहसील कार्यालयामध्ये शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे होते तर प्रांताधिकारी सायली सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या शांतता कमीटीच्या बैठकीत प्रा मधुकर (आबा) राळेभात, खलील मौलाना, शामिरभाई सय्यद , प्रदिप टापरे, मंगेश आजबे, मोहन पवार विकी सदाफुले, महेश राळेभात, डीगंबर चव्हाण, पांडुराजे भोसले, गफ्फारभाई पठाण, कुंडल राळेभात , सनी सदाफुले , विनोद राऊत यांच्या सह गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ,कार्यकर्ते, डी.जे.मालक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस उपनिरीक्षक खैरे म्हणाले की आपली संस्कृती टीकली पाहिजे असे देखावे गणेशोत्सव मंडळांनी दाखवले पाहिजेत. तुम्ही डी .जे समोर नाचताय पण तुम्हीच तुमच्या शरीराचे नुकसान करुन घेऊ नका. डीजीटल बोर्ड मुळे शहर विद्रूपीकरण होत आहे. गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे अन्याथा कारवाईला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकाच दिवशी येत आसल्याने मुस्लिम बांधवांनी ईद ही दुसर्‍या दिवशी साजरी करण्याचे ठरवले आहे.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खुप अफवा पसरत आहेत. मात्र अफवांवर विश्वास न ठेवता पोलीसांशी संपर्क करा संध्याकाळी गणेश मंडळांनी आवाज नियमित करा सामाजिक सलोखा राखा व आपली संस्कृती टीकुन ठेवा पोलीस प्रशासना मार्फत जी मदत लागेल ती केली जाईल. २०२४ पासुन अहमदनगर जिल्ह्यात डीजेवर बंदी घालणार आसल्याची माहितीही पोलीस उपअधीक्षक खैरे यांनी सांगितले.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी गणेश मंडळांच्या आडचणी लक्षात घेऊन शहरातील रस्ते व स्टेटलाईट दुरुस्ती करण्यात येतील व जे मंडळ स्वच्छता अभियान कींवा सामाजिक उपक्रमाचे देखावे अथवा मिरवणुका काढतील अशा मंडळींना बक्षिसे देण्यात येतील असे सांगितले .

यावेळी प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी बोलताना सांगितले की जामखेड शहरात बाहेरील लोकांचे बोर्ड लावण्यावर बंधन घातले पाहिजेत. डीजीटल बोर्ड मुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. त्यामुळे बोर्डाचे प्रमाण कमी झाले पाहिजे. डी जे चा आवाज कमी असला पाहिजे, गणेशोत्सवा दरम्यान शहरातील रस्ते दुरुस्ती केले पाहिजेत. यानंतर विनोद राऊत यांनी बाजारतळ याठिकाणी गाळेबांधकाम सुरू असल्याने गणेश मुर्ती विक्रीची जागा बदलण्याची सुचना मांडल्या प्रमाणे या वर्षी गणेशोत्सव मुर्ती विक्रीची जाग नगरपरिषदे कडुन जुन्या तहसील कार्यालयासमोरील आवारत परवानगी देण्यात आली आहे.

प्रदिप टापरे यांनी गणेशोत्सव दरम्यान शहरातील रस्ते व स्टेटलाईट दुरुस्ती करण्याची मागणी नगरपरिषदे कडे केली. नगरसेवक मोहन पवार यांनी विना डीजे व पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढणार्‍या मंडळांना बक्षीस देण्याचे जाहीर केले. शामिरभाई सय्यद यांनी आम्ही हिंदु मुस्लिम प्रत्येक सण शांतता व सलोख्याने साजरे करतो आसे सांगितले तर मैलाना यांनी आम्ही जामखेड मधिल सर्वच समाजाचे बांधव अगदी गुण्यागोविंदाने रहात असतो तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडला तर आम्ही हिंदु मुस्लिम एकत्र होऊन शांततेच्या मार्गाने सोडवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here