धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढावा यासाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे अमरण उपोषण सुरू

जामखेड प्रतिनिधी

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने आज दि ६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील स्मारकास्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत वटहुकुम निघत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच रहाणार आहे असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिला आहे .

यावेळी यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी चौंडी येथे बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील 17 ते 18% लोकसंख्या असलेला धनगर समाज मागील 70 वर्षापासुन घटनेत असलेल्या अनु. जमाती आरक्षण अमलबजावणीची मागणी करीत आहे. अनेकदा अंदोलनेही झालेली आहेत. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे म्हणुन जाहिर भुमिका घेतात. मात्र आरक्षण अंमलबजावनी संदर्भात काहीच कृती होत नाही. यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

त्यामुळे दि. 18 ते 22 सप्टेंबर 2023 या पाच दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनु. जमाती मध्ये आरक्षण अमलबजावणीचा वटहुकुम काढला जावा व यासाठी महाराष्ट्र.
सरकारने पाठपुरावा करावा. या मागणीसाठी आम्ही बी.के.कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने दि.
6 सप्टेंबर पासुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी स्मारकास्थळी आमरण
उपोषण सुरु केले आहे.

याच बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा जी आर काढुन देखील आरक्षण मिळाले नाही .आमचा मेंढपाळ समाज भटकत आसतो त्यांना व त्यांच्या मेंढपाळांना संरक्षण द्या . धनगरांच्या पोरांना ओबीसी आरक्षणाचा फायदा होत नाही त्यामुळे आमची मुले शिकत नाहीत. आम्हाला सरकार न्याय देत नाही केंद्र सरकार न्याय देत नाही मग आम्ही आमचे प्रश्न कोठे मांडायचे म्हणून आम्ही आज चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहोत. तरी आमच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्षपुरवावे व धनगर समाजाला न्याय मिळवुन द्यावा अशी विनंती यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी केले आहे .

आज अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन भूमीत चोंडी येथे धनगर आरक्षण साठी आमरण उपोषण साठी सुरवात झाली. यामध्ये अहील्यादेवी होळकर यांचे मुळ वंशज अक्षय शिंदे पाटील, राज्यमंत्री बाळासाहेब दोलतडे, माणिकराव दांगडे (बारामती) ,आण्णासाहेब रूपनवर (माळशिरस), गोविंद नरवटे (लातुर), सुरेश बंडगर (परभणी) समाधान पाटील (जळगाव), नितीन धायगुडे (नातेपुते), किरण घालमे (इंदापुर), बाळा गायके (बिड) हे उपोषण बसले आहेत. या वेळी चौंडी चे सरपंच सुनील उबाळे, चेअरमन विलास जगदाळे, संतोष कुरडुले, अजित उबाळे, अजित शिंदे, अतिश शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे या ग्रामस्थांनी पाठींबा दिला आहे. उपोषणस्थळी कर्जत जामखेड चे पोलिस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पो. कॉ. नवनाथ शेकडे, पो. ना. संतोष कोपनर यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here