राजुरी येथिल विजेचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा अंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

जामखेड प्रतिनिधी

राजूरी येथील जास्त लोड असल्याने वारंवार जळणारा ट्रान्सफार्मर बदलून व शेती पंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर द्यावा यासाठी वारंवार मागणी करूनही काही फायदा होत नसल्याने सुरू केलेले रास्तारोको आंदोलन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र चार पाच दिवसात जर विजेचा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जामखेड तालुक्यातील मौजे राजुरी येथे नविन स्वतंत्र ट्रान्सफार्मर मिळण्याबाबत यापूर्वी महावितरण कार्यालयास लेखी पत्र देऊनही कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. मौजे राजुरी येथे एक ट्रान्सफार्मर असून त्यावर जास्तीत जास्त लोड असल्याने तो वारंवार जळत आहे. अथवा बिघाड होत आहे. तो त्वरित बदलून द्यावा तसेच राजुरी गावठाणासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर व शेती पंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर करून द्यावा. जेणेकरून संपूर्ण गावचा विषय मार्गी लागेल व नागरिकांची गैरसोय दूर होईल.

यासाठी ग्रामस्थांकडून अनेक वेळा लेखी मागणी करूनही महावितरणचे अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने किंवा कार्यवाही करत नसल्याने काल दि. ४ सप्टेंबर रोजी राजूरी येथील बसस्थानकावर भव्य रास्तारोको अंदोलन करण्यात आले. याची दखल घेत महावितरण अधिकारी टाक यांनी पुढील ५ दिवसात जळालेला व आणखी १ नवीन ट्रान्सफार्मर बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर हे अंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे, उपसरपंच नानासाहेब खाडे, तंटामुक्ती अध्यक्ष मल्हारी गायकवाड, यांच्या सह राजुरी राजूरी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जर लेखी आश्वासन देऊन डीपी बसवली नाही तर यापेक्षा पेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. हे अंदोलनासाठी सहकार्य केल्याबद्दल सरपंच सागर कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे, उपसरपंच नानासाहेब खाडे, तंटामुक्ती अध्यक्ष मल्हारी गायकवाड यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

चौकट

राजूरी हे गाव मोठी लोकसंख्या असलेले शिर्डी हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील गाव आहे. राजुरी गावामध्ये कॅनरा बँक आहे आसपासच्या 08 10 गावातून लोक बँकेत येतात, विज नसल्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प आहेत, तरी महावितरण अधिकाऱ्यांनी लेखी दिलेल्या अश्वासन प्रमाणे चार पाच दिवसात दोन्ही डीपी सुरू कराव्यात अन्यथा 33 kv राजुरी येथे ग्रामस्थांसाह आंदोलन करण्यात येईल.

काकासाहेब कोल्हे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया, तथा ग्रामपंचायत सदस्य राजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here