शिक्षक दिनाच्या दिवशीच जामखेडच्या शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी व व जामखेड शहराला परिचित असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शिक्षिका सौ सुनिता राजेंद्र गायकवाड वय ४८ वर्षे, यांचे आज सकाळी आष्टी येथिल शाळेत शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षिक दिनाचा कार्यक्रम सुरू आसतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सौ सुनिता राजेंद्र गायकवाड या गेल्या वीस वर्षांपासून आष्टी येथिल आनिशा ग्लोबल स्कुल आष्टी या इंग्लिश मेडीयमच्या शाळेवर शिक्षिकेची नोकरी करत होत्या. आज दि ५ सप्टेंबर रोजी सकाळी त्या शिक्षक दिन आसल्याने नेहमी प्रमाणे जामखेडहुन त्या सकाळी आष्टी येथिल आपल्या शाळेवर गेल्या होत्या. सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक दिनाचा शाळेत कार्यक्रम सुरू होता या वेळी त्यांना शाळेतच चक्कर आल्याने त्या खुर्चीवरून खाली कोसळल्या यानंतर उपस्थित शिक्षकांनी त्यांना तातडीने आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असुन अत्यंसंस्कार आज दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.

शिक्षिका सौ सुनिता गायकवाड यांचे पती हे जामखेड नगरपरिषद मध्ये गेल्या वीस वर्षांपासून कर्मचारी म्हणून नोकरी करत आहेत त्यामुळे त्यांचा जामखेड शहरात दांडगा जनसंपर्क आहे. तर मयत सौ सुनिता गायकवाड या देखील आष्टी येथिल आनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूल या ठीकाणी वीस वर्षांपासून नोकरी करीत होत्या शिक्षका सौ सुनिता गायकवाड या जामखेडहुन दररोज आष्टी या ठीकाणी शाळेत नोकरीसाठी ये जा करीत होत्या. आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आसल्याने व शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षिका सौ सुनिता राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला आसल्याने शिक्षक व मित्र परीवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here