शेतकऱ्यांसाठी विजपुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरण कार्यालयात ठीय्या आंदोलन करु

शेतकर्‍यांसह जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस झाली आक्रमक

जामखेड प्रतिनिधी

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही जामखेड तालुक्यातील शेतीपंपाचा खंडित वीज पुरवठा (लोड शेडिंग) खंडीत होत आहे .मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचा विजपुरवठा सुरळीत करा अन्यथा जामखेड महावितरण कार्यालयात ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा जामखेड तालुक्यातील शेतकरी व जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील शेतकरी व जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि १ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी जामखेड महावितरण कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या बाबत जमा झाले होते. कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असते .अशा परिस्थितीत जुन ते ऑगस्ट मध्ये सरासरी पेक्षा खुपच कमी पाऊस झाला आहे .त्यामुळे शेती व जणावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे .जामखेड तालुक्यातील साकत, नायगाव, राजुरी, खर्डा -२, जवळा, तरडगाव, खांडवी व आरणगाव या ठिकाणी असलेल्या सर्व सबस्टेशन मध्ये सध्या अनियमित वीज पुरवठा होत आहे .

त्यामुळे जामखेड तालुक्यातील विजपुरवठा नियमित व पुरेशा दाबाने उपलब्ध होईल याची सोय करावी सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शासन स्तरावरून भारनियमन केले जाण्याची शक्यता आहे याची जाणीव जरी आम्हाला आसली तरी शेतकर्‍यांच्या हाताच्या दुष्टीने जामखेड तालुक्यातील वीजपुरवठा दिवसा कीमान दहा ते बारा तास उपलब्ध कसा होईल याबाबत महावितरण विभागाने तातडीने लक्ष द्यावे. जर जामखेड तालुक्यातील विजपुरवठा सुरळीतपणे सुरू झाला नाही तर महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषणास करण्यात येईल असा इशारा देखील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे .या नंतर जामखेड महावितरण विभागाचे उपअभियंता एस एस चेचर यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सूर्यकांत मोरे , रमेश (दादा )आजबे, हनुमंत पाटील, सुरेश भोसले, बाबासाहेब मगर, सुंदरदास बिरंगळ, हरिभाऊ आजबे , दादासाहेब ढवळे, दत्ता माने, नितीन ससाने, अमोल गिरमे ,प्रकाश सदाफुले, युवराज जोगले, सुरेश जगताप , कुंडल राळेभात, सुरज राऊत, काकासाहेब चव्हाण, राजेंद्र गोरे, बाळासाहेब खैरे, नवनाथ डोके, काशिनाथ मोरे,  परमेश्वर मोरे, दत्तात्रय सोले पाटील, किशोर परदेशी, अंकुश राळेभात, अमित जाधव, उमर कुरेशी, महेश राळेभात, मोहन पवार, चांद भाई तांबोळी, वसीम भाई सय्यद, गणेश बांदल, गणेश हगवणे, अमर चाऊस, सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, श्रीकांत लोखंडे रामहरी गोपाळ घरे, अरुण गाडेकर संतोष ढवळे ,गणेश वारे, शहाजी राळेभात सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते .

चौकट

आ. रोहित पवार यांनी कर्जत व जामखेड साठी महावितरण कार्यालयास विद्युतरोहीत्र बसवण्यासाठी एकुण ५ कोटी १५ लाख रुपये मंजूर केले आहेत .या मध्ये जामखेडला २२ विद्युतरोहीत्र तर कर्जतला २८ विद्युतरोहीत्र बसवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील एकमेव आ. रोहित पवार आहेत की त्यांनी २०२२-२३ मध्ये एवढा नीधी उपलब्ध करून दिला आहे. आशी माहिती या वेळी जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here