एस. टी. बस मध्येच झाला बहीण भावाचा अनोखा रक्षाबंधन साजरा ,सर्व स्तरातून होतय कैतुक

जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले) 

जामखेड एस टी बस अगारात चालक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपली बहीण ही पुणे येथुन गावी चालली होती .मात्र भावाला सुट्टी नसल्याने तो प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी बस घेऊन आपल्या कामावर चालला होता. मात्र योगायोगाने या दोन्ही बहीण भावाची भेट जामखेड बस स्थानकात झाली. पण भावाला गावी जाण्यासाठी वेळ नसल्याने बहीणीने स्वतः एस टी बस मध्येच आपल्या चालक असलेल्या भावाला राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला. या आगळ्यावेगळ्या साजरा झालेल्या रक्षाबंधनाचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे. 

रक्षाबंधन म्हणजे रक्षण आणि बंधन यांचा समन्वय होय. आपल्या हिंदू धर्मात या सणाला फार मोठे महत्त्व आहे. यात बहीण भावाला हाताच्या मनगटाला राखी बांधते अन् आपले रक्षण करण्याचे वचन भावाकडून घेते. याच अनुषंगाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहीणी निघाल्या आसल्याने आनेक भागात रक्षाबंधन या सनाच्या पाश्र्वभूमीवर एस टी बस परीवाहन मंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी जादा एस टी बस फेर्‍या वाढवण्यात आल्या होत्या .त्यामुळे आनेक ठिकाणी एस बस वाहक व चालकांना रक्षाबंधनासाठी आपल्या बहीणीकडे राखी बांधण्यासाठी जाता आले नाही.

जामखेड येथील एस टी बस अगारात आशोक मस्के हे एस टी बस चालक म्हणून नोकरी करतात त्यांना देखील रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहीणीकडे राखी बांधण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे त्यांची पुणे या ठिकाणी रहात आसलेली बहीण रामकुवर भारत जावळे ही स्वतः आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी पुणे येथुन जामखेड जवळील सौताडा या ठिकाणी चालल्या होत्या. मात्र त्यांचा भाऊ जामखेड आगारात चालक म्हणून नोकरी करत असल्याने त्याला रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी मिळाली नाही.

त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी जामखेड अगाराचे चालक आशोक मस्के हे सकाळी जामखेड स्वारगेट ही एस टी बस घेऊन जामखेड एस टी बस स्थानकात आले होते. योगायोगाने त्यांची बहीण देखील आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्या गावी चालली होती मात्र या दोघांची योगायोगाने जामखेड बस स्थानकातच भेट झाली. मात्र चालक म्हस्के यांना आपले आपले काम सोडुन बहीण घरी आली असतानाही राखी बांधण्यासाठी जाता आले नाही .त्यामुळे त्यांची बहीण रामकुवर भारत जावळे यांनी एस टी बस मध्येच चालक असलेल्या भावाला राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला. एस टी बस मध्येच या आगळ्यावेगळ्या साजरा झालेल्या रक्षाबंधनाचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here