जामखेड तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा काढले डोके वर, दहा पॅझीटीव्ह, दोन जणावरांचा मृत्यू
प्रशासनाकडु जामखेडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद
जामखेड: (अविनाश बोधले) जामखेड तालुक्यात लंपी स्कीन आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात यावर्षी अत्तापर्यंन्त दहा जनावरे पॅझीटीव्ह आढळून आले आसुन दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली आहे. जनावरांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शनिवारी भरणारा जनावरांचा अठवडी बाजार देखील प्रशासनाकडु बंद करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यात लंपी स्कीन आजाराचा धोका मागिल वर्षीच्या तुलनेत कमी झाला आसला तरी या अजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व एकुण जणावरांची संख्या ७४५०० एवढी आहे. या मध्ये गायवर्गाची एकुण संख्या ५९ हजार ९५१ एवढी आहे. मागिल वर्षी ३७८१ जनावरे पॅझीटीव्ह आढळून आली आहेत. तर २३२ जनावरांचा मृत्यू झाला होता. यासर्व मयत २३२ जनावरांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात मिळाली आहे.
जामखेड तालुक्यात सध्या १० जनावरे लंपी स्कीनचे आढळून आले आहेत. या मध्ये चुंबळी येथे २, जमादारवाडी येथे २ व महारुळी येथे १ आशी एकुण पाच जणावरे ॲक्टीव्ह आढळून आली आहेत. तर दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जामखेड शहरात भरणारा आठवडी बाजार देखील प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यात शिल्लक राहिलेले व नवीन ज्या जणांवरांचे लसीकरण झालेले नाही अशा जणांविरांचा शोध सुरू आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी लंपी स्कीन आजाराचे जणावरे आढळून येतील त्यांनी तातडीने जामखेड येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार करुन घ्यावेत तसेच ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह जनावरे आढळून येत आहेत त्याठिकाणी देखील आम्ही उपचारासाठी जात आहोत. शेतकऱ्यांनी आपला गोठा व परीसर स्वच्छ ठेवावा, पॅझीटीव्ह जनावरांना वेगळे ठेवण्यात यावे व आपल्या जणावरांची काळजी घ्यावी आसे आवाहन जामखेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार अधिकारी डॉ. मच्छिंद्र घोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here