तालुक्यातील सांगवी येथे लोखंडी गज व कुर्‍हाडीने हल्ला, पाच जण जखमी, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
तीन एकर शेतीच्या वादातून तसेच जनावरे बांधल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील सांगवी येथे लोखंडी गज, काठाने व कुर्‍हाडीने केलेल्या मारहाणीत फीर्यादीच्या आई वडीलांसह एकुण पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत डिगांबर महारनवर, संजय डिगांबर महारनवर, वैभव भागवत महारनवर, योगेश संजय महारनवर, राम कुवर भागवत महारनवर, उर्मिला संजय महारनवर, सुशिला डिगांबर महारनवर सर्व रा. सांगवी ता. जामखेड जि अहमदनगर आशा गुन्हा दाखल झालेल्या सात आरोपींची नावे आहेत.
पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील सांगवी या ठीकाणी फिर्यादीच्या यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत दि 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सात वाजता वरील आरोपींनी संगनमत करुन तीन एकर शेतीच्या वादातुन तसेच फिर्यादिच्या जागेत ‘जनावरे बांधल्याचे कारणावरून फिर्यादि, फिर्यादिची भावजय, आई, वडील व मुलगा यांना लोखंडी गजाने लाकडी काठीने, कु-हाडीने शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहान करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. या मारहाणीत फिर्यादी महादेव जालींदर महारनवर, वडील जालिंदर महारनवर, आई- इंदूबाई जालिंदर महारनवर, भावजय अलका महारनवर, मुलगा विशाल महारनवर आसे एकुण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी फीर्यादी महादेव जालींदर महारनवर वय-43 वर्ष, धंदा-शेती रा-सांगवी ता-जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात ओरोपीन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here