नागेश्वर यात्रेनिमित्त कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ जामखेड येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन
यावर्षीचे जंगी कुस्त्यांचे 21 वे वर्ष
जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य विराट निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड या शाळेत दि. 22 ऑगस्ट मंगळवार रोजी दु.1 वा. केले आहे. या जंगी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा.राम शिंदे असतील. तसेच हे कुस्ती मैदान ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान, पिंपळवंडी) तसेच प.पू.संत श्री. 1008 महामंडलेश्वर दादोजी महाराज इंदोर यांच्या आशीर्वादाखाली संपन्न होईल.
कुस्तीच्या जंगी मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुजय (दादा) विखे पाटील, सुरेश (आण्णा) धस (आमदार,बीड-धाराशिव-लातूर) आ. रोहित (दादा) पवार (कर्जत-जामखेड). बाळासाहेब (काका) आजबे (आमदार आष्टी-पाटोदा-शिरूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
या कुस्ती मैदानामध्ये कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय व्यक्ती, तसेच पैलवान यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. जागतिक पोलीस आणि फायर गेम विजेते पै. विजय चौधरी (DYSP), पै. राहुल आवारे (DYSP), पै. नरसिंग यादव (DYSP), पै. रोहित पटेल (हिंद केसरी) तसेच आशियाई कुस्ती स्पर्धेतील चॅम्पियन पै. सुजय तनपुरे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या जंगी कुस्ती मैदानाचे हे 21 वे वर्ष असून, सालाबाद प्रमाणे या जंगी मैदानासाठी राज्य,आंतरराज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या पैलवानांमध्ये महत्त्वाच्या कुस्त्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आहेत.मध्य प्रदेश,हरियाणा व पंजाब या राज्यातील नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहून, कुस्त्या खेळणार आहेत. कुस्ती शौकीनांसाठी ही पर्वणी असून, याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कुस्ती मैदानाचे आयोजक श्री अजय (दादा) काशीद यांनी केले आहे.
सालाबाद प्रमाणे सदर विराट निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन युवराज (भाऊ) काशीद (अध्यक्ष, मराठा भाषिक संघ, मध्यप्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पै.बबन (काका) काशीद (उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशा स्वरूपात संपन्न होणार आहेत. तरी या भव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानासाठी सर्व कुस्तीप्रेमींनी, जामखेड तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती मैदानाची शोभा वाढवावी, असे आवाहन या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजक मा. अजय (दादा)काशीद (तालुकाध्यक्ष, भाजपा तथा सरपंच सारोळा) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here