श्री क्षेत्र तेर श्री संत गोरोबा काका मंदिर व परिसरचा होत आहे कायापालट, अत्तापर्यंन्त ७ कोटींचा निधी मंजूर

धाराशीव प्रतिनिधी

श्री क्षेत्र तेर श्री संत गोरोबा काका मंदिर व परिसरचा वेगाने विकास होत आहे. अत्तापर्यंन्त ७ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याकामी विषेश लक्ष घातले असून मंदिराच्या विकासाचा अंदाजे १५ कोटींचा आराखडा बनवून मंत्रालया मध्ये पुढील मंजुरी साठी तयार केलेला आहे. आशी माहिती महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे प्र. सरचिटणीस विनायक विठ्ठलराव राऊत यांनी दिली आहे.

श्री संत शिरोमणी गोरोबा काकांची जन्मभूमी तथा कर्मभूमी श्री क्षेत्र तेर ही समस्त कुंभार समाज बांधवांसाठी एक पवित्र तिर्थक्षेत्र असून तेर नगरी चा विकास व्हावा, काकांचे समाधी मंदिर व परिसर चांगला विकसित व्हावा आणि प्रत्येक समाज बांधवाने वर्षातून एकदातरी वेळ काढून तेर दर्शनासाठी नक्की यावे. यासाठी सतत आग्रही असणारे वै.विठ्ठलराव (अण्णा) राऊत, श्री नागनाथ (अण्णा) कुंभार, श्री महादेवराव खटावकर व मोहनराव जगदाळेसह विकास संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे.

मध्यंतरीच विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने माननीय ना. श्री तानाजीराव सावंत पालकमंत्री धाराशिव (उ.बाद) जिल्हा यांची भेट घेऊन निवेदन ही दिलेले होते व त्यांचे बरोबर सविस्तर चर्चा ही केलेली होती . जिल्हा नियोजन मंडळाने गोरोबा काकांच्या मंदिर विकासाच्या कामासाठी अत्तापर्यंन्त ७ कोटींचा निधीही मंजूर केलेला होता.

तेरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याकामी विषेश लक्ष घातले असून मंदिराच्या विकासाचा अंदाजे 15 कोटींचा आराखडा बनवून मंत्रालया मध्ये पुढील मंजुरी साठी तयार केलेला आहे. सोबत समाज बांधवाचे माहिती करिता दोन प्रकारचे आराखडे जोडले आहेत. कृपया समाज बांधवांनी ते पहावेत. दिनांक 13 ऑगस्ट रोजी धाराशिव (उ.बाद) येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी काही निवडक निमंत्रकांसमोर सदर दोन्ही आराखड्यांचे सादरीकरण करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तेर नगरीचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक ग्रामस्थ व विकास संस्थेचे राज्य अध्यक्ष श्री शामशेठ राजे, नागनाथ (अण्णा) कुंभार, विनायक राऊत व दत्ता कुंभार डाळजकर यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. या नंतर पालक मंत्री श्री तानाजीराव सावंत साहेब, आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचे समस्त कुंभार समाज्यातर्फे आभिनंन करण्यात आले. आशी माहिती महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे प्र. सरचिटणीस विनायक विठ्ठलराव राऊत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here