जामखेड येथिल कल्याणी डोळ्यांचे हॉस्पिटल या ठीकाणी दि १४ व १५ ऑगस्ट रोजी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल कल्याणी डोळ्यांचे हॉस्पिटल या ठीकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त दि १४ व १५ ऑगस्ट रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर व अल्पदरात दुर्बिणीद्वारे (फेको) मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या मोफत डोळे तपासणी शिबिरात गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड येथिल कल्याणी डोळ्यांचे हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ सौ. विद्या संजय तोंडे (केदार) यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील गरजु रुग्णांना महाग वैद्यकीय सेवेच्या अडचणी लक्षात घेता;या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत डोळे तपासणी शिबिरात ज्यांना डोळयांचा त्रास असेल, जसे, डोळयातुन पाणी येणे, डोके दुखणे, दुरचे-जवळचे बरोबर न दिसणे इत्यादी. अशांनी आपल्या डोळ्यांची तपासणी या शिबिरात करुन घ्यावी. तपासणी निशुल्क आसुन आवश्यक आसलेल्या रुग्णांवर अल्पदरात दुर्बिणीद्वारे (फेको) मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सर्वांसाठी मोफत डोळे तपासणी करून मिळणार असल्याने सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा; असे आसे आवाहन जामखेड येथिल कल्याणी डोळ्यांचे हॉस्पिटल च्या डॉ सौ. विद्या संजय तोंडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here