डोळ्यांची साथ वाढली, परस्पर ड्रॉप न टाकता नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांन कडुच डोळे तपासून घ्या – नेत्ररोगतज्ज्ञ सौ.डॉ. सौ विद्या संजय तोंडे (केदार) यांनी केले अवाहन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात काही दिवसांपासून डोळ्यांची साथ सुरू असून, ही साथ आता काहीशी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. मात्र फक्त मेडिकल मधुन ड्रॉप आनुण न टाकता नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांन कडुन योग्य उपचार करुन घेणे गरजेचे आहे. सर्वच पेशंटला स्टेरॉईडची गरज आसेलच आसे नाही योग्य ती डोळ्यांची तपासणी करून योग्य औषध घेणे गरजेचे आहे. अन्यथा डोळ्यावर गंभीर व दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात आशी माहिती जामखेड येथिल कल्याणी डोळ्यांच्या हॉस्पिटल च्या नेत्ररोग तज्ञ डॉ. सौ विद्या संजय तोंडे (केदार) यांनी दिली.
जुलै महिना सुरू झाल्या पासून ही डोळ्यांची साथ सुरू झाली आहे. मात्र मागच्या एक ते दोन आठवड्यांपासून ही साथ खूप जास्त प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डोळे आले असल्यास शक्यता बाहेर पडणे टाळले पाहिजे. बाहेरच्या धूळ, माती, वाऱ्यामुळे‘व्हायरल कन्जक्टिव्हायटिस’चा त्रास आणखी वाढतो आणि काही वेळेला डोळ्यावर गंभीर परिणामदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डोळे आले असताना घरात राहणे व मुख्य म्हणजे घरच्यांपासून दूर राहणे, स्वत:चे कपडे, साबण, वस्तू वेगळ्या ठेवणे गरजेचे आहे, असे जामखेडच्या नविन बस स्टँड समोर आसलेल्या कल्याणी डोळ्यांच्या हॉस्पिटल मधिल नेत्रतज्ज्ञ डॉ. सौ. विद्या संजय तोंडे यांनी ‘रोखठोक न्यूज जामखेड’शी बोलताना सांगितले.
डोळे आल्यावर अनेकजण स्वत:च मेडिकलच्या दुकानात जाऊन औषधे घेऊन येतात आणि सर्रास वापरतात. मात्र अशा प्रकारच्या‘सेल्फ मेडिकेशन मुळे अनेकदा डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. विशेषत: व्हायरल कन्जक्टिव्हायटिस मध्ये स्टेरॉईडस् टाळले पाहिजे व नेत्रतज्ज्ञांनी दिलेली औषधेच वापरली पाहिजेत. स्टेरॉइडस् मुळे डोळ्यांची सूज वाढून डोळ्यांना कायमस्वरुपी गंभीर फटका बसू शकतो,
आजाराची लक्षणे अशी
-डोळा लाल होणे
-डोळ्यातून सतत
पाणी बाहेर येणे
-सूज येणे, खुपणे
-डोळे कचकच करणे
-किंचित अंधूक दिसणे
अशी घ्या काळजी
-नेत्रतज्ज्ञांकडून लवकरात
लवकर उपचार घेणे गरजेचे
-डोळे आल्यावर शक्यता बाहेर
पडू नये, धुळीमुळे त्रास वाढतो
-आजार खूप जास्त संसर्गजन्य
असल्याने दुसऱ्यांशी संपर्क टाळा
-घरातही इतरांपासून दूर राहा,
स्वत:चा टॉव्हेल, वस्तू वेगळ्या ठेवा आशी माहिती जामखेड च्या नेत्ररोग तज्ञ डॉ. सौ. विद्या संजय तोंडे (केदार) यांनी दिली.