नवर्‍याने केला पत्नी व आईवर कोयत्याने हल्ला, दोघे जखमी, हल्ला करून नवर्‍याचा आत्महत्याचा प्रयत्न.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे अज्ञात कारणाने नवर्‍यानेच आपल्या पत्नी व आईवर कोयत्याने हल्ला केला. याघटनेत पत्नी व आई दोघे जखमी झाले आहेत. घटना घडल्या नंतर नवर्‍याने स्वतः लाईट च्या डीपीला हात लावुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मध्ये लाईटचा करंट लागल्याने नवरा देखील जखमी झाला आहे.
पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की दि ६ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास आरोपी रामचंद्र दशरथ रोडे याने यातील फिर्यादी अलकाबाई दशरथ रोडे (वय ६५) व त्यांची सुन उषाताई रामचंद्र रोडे या दोघींना कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे मारहाण केली. यानंतर आरोपीने ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादिच्या दोन्ही पायाचे घोट्यावर व डावे हाताचे कोपरावर, तसेच फिर्यादिची सून हिचे तोंडावर गळ्यावर, डोक्यावर व हातावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करत फिर्यादिला व फिर्यादिची सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर आरोपीने सुध्दा स्वतः घराजवळ असणार्‍या इलेक्ट्रीक डीपीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत आरोपी देखील स्वतः जखमी झाला आहे. जामखेड येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पो.ना सरोदे यांनी घेतलेल्या जबाबावरून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुनिल बड़े हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here