नराधम बापानेच आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत दिले फेकुन, नेमके पुढे काय घडले वाचा सविस्तर…..
कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावामध्ये नराधम बापाने आपल्या दोन पोटच्या लहान मुलांना विहिरी फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये त्या दोन्हीही लहान बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे . ही खळबळ जनक घटना काल रविवारी सायंकाळी घडली आहे .
हृदय हेलावून सोडणारी घटना कर्जत तालुक्यातील आळसुंदे या गावांमध्ये घडले आहे. गोकुळ जयराम शिरसागर वय 38 वर्ष याने त्याची दोन लहान मुले यामध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी ऋतुजा वय आठ वर्ष व वेदांत वय चार वर्ष. यांना त्यांच्या घरापासून सहाशे मीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीकडे घेऊन गेला आणि उचलून पाण्यामध्ये फेकून दिले. यावेळी विहिरीमध्ये पाणी होते. पाण्यामध्ये फेकून देताच या दोन्ही बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
यानंतर या नराधम बापाने आपण या दोन मुलांना विहिरीमध्ये फेकून दिले आहे अशी माहिती गावातील नातेवाईकांना सांगितली. तात्काळ सर्व ग्रामस्थ घटनास्थळी धावत गेले तसेच पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस ग्रामस्थ या सर्वांनी तात्काळ त्या दोन्हीही बालकांना पाण्याच्या बाहेर काढले होते.
मिराज पठाण यांनी तात्काळ ॲम्बुलन्स मध्ये त्या दोन्हीही बालकांना अवघ्या काही मिनिटांमध्ये उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आणले मात्र डॉक्टरांनी ती दोन्ही बालके यामध्ये मरण पावले आहेत असे तपासणी करून सांगितले.दरम्यान पोलिसांनी नराधम बाप गोकुळ शिरसागर यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान हा प्रकार शिरसागर याच्या दारूचे व्यसन व घरघुती भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. हृदय पिळवटून टाकणार घटना कर्जत तालुक्यामध्ये घडली आहे. घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here