नागपंचमी यात्रा शांततेत पार पडण्याची जबाबदारी घेऊन सहकार्य करावे- तहसीलदार योगेश चंद्रे
जामखेड येथे नागपंचमी निमित्ताने शांतता कमिटीची बैठक संपन्न
जामखेड प्रतिनिधी
नागपंचमीची यात्रे बाबत सुविधा देण्याच्या आनुशंगाने सर्व ग्रामस्थांनी सोबत चर्चा झाली आहे .पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग व महावितरण विभाग यांना देखील सर्व सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली जामखेड ची नागपंचमी यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्याची सर्वांनी जबाबदारी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रसिद्ध असलेली जामखेड ची नागपंचमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच अनुषंगाने नुकतीच जामखेड तहसील कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या मध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत यात्रेच्या आनुशंगाने विविध समस्या व विषयांवर चर्चा झाली.
जामखेड येथील तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती .या वेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी नागपंचमी यात्रेच्या आनुशंगाने आपले प्रश्न व आडचणी सांगताना म्हणाले की जामखेड ची नागपंचमीची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. नागपंचमी निमित्ताने आनंद नगरी मधुन रात्री घरी जाताना महीलांच्या सोईसाठी नगरपरिषदेने सर्व ट्रीटलाईट चेक करु बंद असलेल्या लाईट तातडीने चालु कराव्यात. आनंदनगरी परीसरात सुलभ शौचालयाची सोय करावी .महावितरण ने देखील यात्रा उत्सव दरम्यान शहरातील विद्युत पुरवठा बंद होणार नाही याची काळजी घ्यावी .शहरातील रस्त्यांवर व आनंदयात्रेच्या ठिकाणी मुरुम टाकण्यात यावा. नागेश्वर पालखी ला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. जामखेड शहरात ज्या ठिकाणी कुस्त्यांचा हगामा भरणार आहे त्या साठी पार्किंग ची व्यवस्था केली पाहिजे. नागपंचमीची यात्रा भरते त्या ठिकाणी असलेल्या आनंदीयात्रेतील पाळण्याच्या तिकीटाचे दर कमी ठेवण्यात यावेत अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बोलताना म्हणाले की आनंदयात्रेच्या जागेसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन वाहन व ॲब्युलस जाण्यासाठी रस्ते रुंद आसले पाहिजेत पार्किंग ,सीसीटीव्ही कॅमेरे ,रस्ते रुंदीकरणास , व पोलीस चौकी ,मोबाईल टॉयलेट ची व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. स्वच्छता बाबत दक्षता घेण्यात येईल. नागपंचमी निमित्ताने शहरात लागणार्या शुभेच्छा बोर्ड ची पॅलीसी बनवुन निर्णय घेण्यात येईल .
यानंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की पोलीस प्रशासनाच्या बाबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकता ती उपाययोजना करण्यात येईल. खर्डा चौक, जयहिंद चौक व बीड रोड याठिकाणी चौकी बाबत उपाययोजना करण्यात येतील .आनंद नगरी या सीसीटीव्ही कॅमेरे ,पार्किंग व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. सर्वांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळेचे बंधन पाळायचे आहे. यात्रेच्या निमित्ताने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात येईल .