विहिरीमध्ये मातीखाली गाडलेल्या चारही मजुरांचे, मृतदेह आखेर चौथ्या दिवशी सापडले.

इंदापूर : म्हसोबाचीवाडी (ता.इंदापूर) येथे १२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत सापडले. तब्बल साठ तासानंतर चारही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. चरही मजुर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याने गावावरती शोककळा पसरली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंट क्रॉक्रिटीकरण चा कठडा) तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यापासुन सुरु होते. यासाठी बेलवाडी गावातील दहा ते बारा मजूर एका ठेकेदाराकडे रोजंदारीवरती काम करीत होते.

मंगळवार (ता.१) रोजी पोर्णिमा असल्यामुळे बहुतांश कामगार देवदर्शनासाठी गोंदावले येथे गेले होते. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी ( वय ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय ३०), लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे चौघेजण सकाळी लवकर कामावरती गेले. दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीमध्ये कोसळले. त्यांच्या अंगावरती मुरुम व माती पडल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

घटनेनंतर रात्री लगेच बचाव कार्याला सुरवात झाली.आज शोध मोहिमेचा चौथा दिवस होता. चार दिवसामध्ये पोकलेन मशिनच्या साहय्याने विहिरीच्या परीसरातील माती व मुरुम हटवला. विहिरीतील पाणी व मलबा हटविल्यानंतर चार मजुरांचे मृतदेह एनडीआरएफ च्या जवानांनी बाहेर काढले.

बेलवाडी गावावरती शोककळा…

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी ( वय ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय ३०), व लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे चार मजूर एकाच गावातील होते. संपूर्ण गावच गेल्या तीन पासुन शांत झाले होते. एकाच गावातील चौघांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे गावावरती शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here