एम आय डी सीला विरोध म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराला विरोध – अमर चाऊस
जामखेड प्रतिनिधी
जामखेड व कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आ.रोहित पवार हे गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात एम आय डी सी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र श्रेय लाटण्यासाठी विरोधक एम आय डी सीला विरोध करत आहेत. मात्र विरोधकांनो एम आय डी सीला विरोध करुन सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगाराला विरोध करत असाल तर याद राखा असा इशारा राष्ट्रवादीचे अमर चाऊस यांनी बोलताना दिला.
गेल्या तिन वर्षापासुन कर्जत जामखेड चे आमदार रोहीत (दादा) पवार MIDC च्या मंजुरीसाठी रात्रन दिवस प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी आनेक वर्षापासून या मतदारसंघात एकहाती सत्ता उपभोगली आहे मात्र साधा सुतगीरणीचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. कर्जत जामखेडच्या एम आय डी सीला विरोध करणे म्हणजेच सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराला विरोध करणे आहे आणि हे पाप तुम्ही कोठे फेडणार आहेत. विरोधकांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगार तरुण त्यांना त्यांची जागा दाखवून देतील यात शंका नाही.
आता कुठेतरी MIDC होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे .त्यामुळे याचे सर्व श्रेय आ.रोहित पवार यांना जाईल त्यामुळे विरोधक आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचा हा प्रयत्न आम्ही आणुन पाडल्या शिवाय रहाणार आसे देखील मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चाऊस यांनी व्यक्त केले.


