राजुरी जवळ विटांचा ट्रॉक्टर अंगावर पल्टी होऊन एकाचा जागीच मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजुरी गावाजवळ विटांचा ट्रॅक्टर अंगावर पल्टी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी संपत काळे वय ६० रा. पाटोदा (गडाचे) तालुका जामखेड असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की
जामखेड पासून ८ किलोमीटर अंतरावर जामखेड खर्डा रोडवरील राजुरी गावाजवळ वीटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी या ट्रॅक्टरच्या वरती बसलेला शिवाजी संपत काळे वय ६० रा पाटोदा (गडाचे) तालुका जामखेड याचा या विटांनखाली दबुन जागीच मृत्यू झाला. उताराला या ट्रॅक्टरला ब्रेक न लागल्याने ट्रॉली पलटी झाला आसल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अजय साठे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन द्वारे सांगितली यानंतर कोठारी यांनी आपले मित्र निखिल कुमकर यांना घेऊन घटनास्थळी गेले असता त्याचा मृतदेह आपल्या रुग्णवाहिकेत आणून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे दाखल केला. असून त्याचे पोस्टमार्टम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज शिंदे आणि किशोर बोराडे यांनी केले. पुढील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय साठे हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here