निवारा बालगृहातील मुलींना पै. प्रविण (भैय्या) करडकर त्यांच्या वाढदिसानिमित्त खाऊ वाटप

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक भान जपत वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून निवारा बालगृहातील मुलींना पै. प्रविण (भैय्या) करडकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

वाढदिवस म्हंटले की महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, डीजे चा ठेका व भला मोठा केक असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र हाच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जामखेड चे प्रविण (भैय्या) करडकर त्यांच्या वाढदिसानिमित्त जामखेड येथिल निवारा बालगृहातील मुला मुलींना खाऊ वाटप करण्यात आले. व यानंतर या निवारा बालगृहातील मुलांसोबत आपला अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला.

त्यावेळी बालगृहातील सर्व कर्मचारी व लहान लहान मुले व मुलींनी प्रविण (दादा) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं व त्यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी प्रविण दादांच्या विचारांना मान देऊन त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी मित्र- युवा नेते मा.कृष्णा डुचे, म.पो संदीप सांगळे, महेश पवार, अनिल ठाकरे, अजय वाकळे, कांतेज समुद्र, आबासाहेब जाधव, शंकर डूचे, मंगेश पवार, अशोक डूचे, मुकेश साळवे, संदीप डूचे, संदेश पवार, महेश डोके व निवरा बालगृहातील बाल गोपाल इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here