

पकडण्यास गेलेल्या आरोपींन कडुन पोलिसांना पिस्टलने जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी देखील दिले चोख प्रत्युत्तर….
जामखेड पोलीस स्टेशनला याच आरोपींनवर आनखी दुसरा गुन्हा दाखल… वाचा सविस्तर काय आहे बातमी….
जामखेड प्रतिनिधी
चारचाकी वाहन पळवून नेलेल्या तीन आरोपींना पकडण्यास गेलेल्या पोलीसांवर यातील एका आरोपीने त्याच्या कडील पिस्टल ने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांच्या व स्वसंरक्षणार्थ जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपींच्या पायावर गोळी झाडून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील जखमी आरोपीस नगर येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. याच आरोपींनवर पोलिसांनी जामखेड पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्या प्रकरणी पहीला गुन्हा याच तीन आरोपींनवर वाहनचालक अदनान जहुर शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरी व आर्म ॲक्ट चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी देखील जामखेड पोलीस स्टेशनला वेगळी फीर्याद दाखल केली आहे. आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न करणे असा दुसरा गुन्हा याच तीन आरोपींन विरोधात दाखल करण्यात आला आहे.

या बाबत दुसर्या गुन्ह्यातील माहिती अशी की जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, 19 रोजी मध्यरात्री आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे अदनान जहर शेख (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांचे डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील अर्टिगा गाडीची (एमएच 12 केटी 4795) चोरी केली होती.

आम्ही आरोपी इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांचा शोध घेऊन आमचे सरकारी काम करीत असताना जामखेड ते खर्डा असे जाणारे रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याचे कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढुन आम्हाला जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील पिस्टल आमच्या दिशेने रोखुन, पिस्टलचे ट्रिगर दाबुन आमच्यावर गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्याचे पिस्टलमधील गोळी फायर झाली नाही त्याच वेळी आमचे पथकातील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीत नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार व त्याचे साथीदार यांना ” तुझ्या हातातील पिस्टल खाली टाक, तुम्ही तिघेही सरेंडर करा” असे आवाहन करुन देखील आरोपीत यांनी त्यांचेकडील पिस्टल मधुन फायर करण्याचे उददेशाने पिस्टल पुन्हा कॉक करण्याचा प्रयत्न करुन तसेच आमचेशी झटापट व आम्हाला मारहाण केली. त्याच प्रमाणे आम्ही करीत असलेले सरकारी कामात अडथळा आणुन आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सदर वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आमचे सर्वाचे स्वसंरक्षनार्थ आरोपी इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याचे दिशेने झाडलेली गोळी त्याचे उजवे पायाचे पंजावर लागुन तो जखमी झालेला आहे. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.






