

बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवले, ओरोपीकडुन पोलिसांनवर गोळीबार करण्याचा प्रयत्न, पोलीस निरीक्षकांनी स्वसंरक्षणासाठी केला आरोपीच्या पायावर गोळीबार
जामखेड प्रतिनिधी
मित्रासोबत चारचाकी वाहनात बसलेल्या एकास तीन जणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या जवळील आसलेली चारचाकी गाडी पळवून नेली. यावेळी या गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना गाठले आसता एका आरोपीने कमरेच्या पिस्टल ने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तातडीने जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी प्रसंगावधान राखून एका आरोपीच्या दिशेने फायर केला यामध्ये संबधित आरोपीच्या पायाला गोळी लागल्याने तो घटनेत जखमी झाला. या घटने प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी यातील फीर्यादी अदनान जहर शेख वय २० वर्षे रा. रसाळ नगर तपनेश्वर रोड जामखेड हा दि १९ जुलै रोजी मध्यरात्री त्याचा मित्र प्रज्वल पालवे आसे दोघेजण चारचाकी वाहनात बोलत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आरोपी प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार वय ३० वर्षे, शुभम बाळासाहेब पवार वय २१ व काकासाहेब उत्तम डुचे वय २१ वर्षे सर्व रा. सारोळा. ता. जामखेड आसे तिघेजण आले व फीर्यादी कडील चारचाकी गाडी मागु लागले. यावेळी फीर्यादीने त्याच्या कडील गाडी देण्यास विरोध केला व गाडी घेऊन जात असताना यातील आरोपी प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार हा गाडीच्या मागिल सीटवर बसला ही गाडी खर्डा रोडवर आली आसता आरोपींनी फीर्यादीच्या डोक्याला पिस्टल लावुन त्याच्या कडील गाडी पळवून नेली.

यानंतर सदर फीर्यादीने ही घटना जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सांगितली. यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांचे पोलीस पथक हे गाडीच्या जीपीएस द्वारे गाडी व आरोपींचा शोध घेत आसतानाच त्यांना सारोळा रोडवर पळवून नेलेली चारचाकी गाडी आढळून आली मात्र त्यावेळी गाडीतील आरोपी पळुन गेलेले पोलिसांच्या लक्षात आले.
या नंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आसतानाच तीनही आरोपी खर्डा रोडवरील मारुती मंदिराच्या आलीकडील एका हॉटेल जवळ दिसले. पोलीस आरोपींना पकडण्यास गेले आसता आरोपींनी पोलिसांना विरोध करत आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल काढले व पोलिसांच्या दिशेने रोखले व खटका दाबला परंतु सुदैवाने त्या पिस्टल मधुन फायर झाले नाही त्यामुळे पुन्हा पिस्टल लोड करण्याचा प्रयत्न करीत असतानाच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्या जवळील पिस्टल ने बाळा पवार यांच्या दिशेने फायर केला. यावेळी आरोपी बाळा पवार याच्या उजव्या पायाच्या पंजाला गोळी लागून तो या घटनेत जखमी झाला. तर इतर दोन आरोपी शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यास पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील बाळा पवार हा जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी एकुण तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट सह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.






