धक्कादायक! हळगाव येथे शेततळ्यात आईसह दोन मुलांचे आढळले मृतदेह

जामखेड प्रतिनिधी, दि १३

तालुक्यातील हळगाव या ठीकाणी भीमराव माहदू पिंपळे रा. हळगाव यांच्या शेतातील गट नंबर ४३४ मधील शेत तळ्यामध्ये आई सह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. पाण्यात बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या या बाबत पोलीस तपास करीत आहेत.

पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी या घटनेतील मयत मुलांची आई चांदणी  (उर्फ)  उमा बबन पाचरणे वय ३१ वर्ष रा. हळगाव ही आपल्या दिपाली बबन पाचारणे वय ११ वर्ष व राजवीर बबन पाचारने वय ८ वर्ष या दोन मुलांसह सोमवार दि १० जुलै २०२३ रोजी हळगाव येथिल रहात्या घरातुन बेपत्ता झाली होती. दिवसभर तीच्या घरच्यांनी शोधाशोध केली मात्र हे तीघेही आढळून आले नाही. त्यामुळे मयत महीलेचे पती बबन पाचरणे यांनी दि ११ जुलै २०२३ रोजी जामखेड पोलीस स्टेशनला पत्नी व दोन मुले हरवले आहेत आशी तक्रार दाखल केली.

यानंतर बुधवार दि १२ रोजी भीमराव माहदू पिंपळे रा. हळगाव यांच्या शेतातील गट नंबर ४३४ मधील शेत तळ्यामध्ये (आई) चांदणी (उर्फ) उमा बबन पाचरणे वय ३१ वर्ष, दिपाली बबन पाचारणे वय ११ वर्ष (मुलगी), राजवीर बबन पाचारने वय ८ वर्ष (मुलगा) आशा तीघांचे मृतदेह शेततळ्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती तातडीने परीसरातील लोकांनी हळगाव येथिल पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांना कळवण्यात आली. या नंतर पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे रा. हळगाव यांनी ही माहिती जामखेड पोलीस स्टेशनला कळवली या नंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि सुनील बडे हे आपल्या पथकासह घटना घडली त्या ठिकाणी दाखल झाले.

यानंतर तीनही मृतदेह शेततळ्यातून गावकऱ्यांच्या मदतीने शेत तलावाच्या बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी जागीच दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलून तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो नि महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि बडे हे करीत आहेत.

या तीनही जणांचे शेततळ्यात मृतदेह आढळून आले आसल्याने नेमके या दुर्घटनेचे कारण अद्याप समजु शकले नाही. त्यामुळे मृत्यू बाबत पोलीस आधिक चौकशी करत आहेत आशी माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत. आईसह तीघांच्या मृत्यू मुळे हळगाव सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here