डोणगाव येथील बारा वर्षाच्या मुलीची छेडछाड व विनयभंग, पाच अरोपी विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल.

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. गावातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आकाश दादासाहेब धनवे, दादासाहेब मारुती धनवे, कृष्णा दादासाहेब धनवे, विशाल प्रकाश मोरे, प्रकाश गोरख मोरे सर्व रा. डोणगाव ता. जामखेड यांचे विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादीत मुलीच्या आईने म्हटले आहे की, दि. १२ रोजी शेतातुन जनावरांना चारापाणी करून आमचे राहते घरी आले. त्यावेळी माझी मुलगी ही रडत होती. त्यामुळे मी का रडत आहे, असे विचारले असता तिने सांगितले की, आज शाळा सुटल्यावर मी व माझ्या मैत्रिणी यांचे सोबत आपल्या गावातील खंडोबाच्या मंदीरात पाया पडायला गेलो होतो. त्या ठिकाणी आकाश दादासाहेब धनवे याने माझा हात धरून ओढले व तु मला खुप आवडते असे म्हणाला तसेच आकाश याने, चार पाच दिवसा पूर्वी मला डोळा मारला होता यावेळी ती खुप घाबरलेली होती. काही वेळाने माझा नवरा घरी आल्यावर त्यांना प्रकार सांगितला त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मी माझा नवरा दीर असे सर्वजण दादासाहेब धनवे यांचे घरी जाब विच्यारण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी असलेले वरील आरोपी हे सर्वांनी आमचे काही एक ऐकून न घेता हातात काठ्या घेऊन आमच्या अंगावर धावुन आले तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा विनयभंग व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here