

कलाकेंद्रावर छापेमारी ! कलाकेंद्रात चालत होते मुलींचे लैंगिक शोषन, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
बीड: केज परिसरातील एका कलाकेंद्रावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या कलाकेंद्रात मुलींचे लैंगिक शोषन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू असून सदर कलाकेंद्र हे सेनेच्या जिल्हाप्रमुखाचे आहे. कारण तसा उल्लेख उमरी ग्रामस्थांनी पोलिसांनी दिलेल्या पत्रात केलेला आहे. मग हा जिल्हा प्रमुख नेमका कोणत्या गटाचा आहे, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

6 जुलै 2023 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ठाणे केज हद्दीत चालणार्या त्या कलाकेंद्रावर काल दि. 07 जुलै 2023 रोजी 02.30 वाजता छापा मारला, यावेळी शासनाचे आदेशाचे उल्लंघन करून सदर कलाकेंद्राला दिलेल्या वेळेनंतर रात्री आडीच वाजल्या नंतर उशीरा डिजेवर गाणे लावुन रुमध्ये नृत्य चालु असल्याचे दिसून आले.

सदर कलाकेंद्राची पहणी केली असता कलाकेंद्रात वेगवेगळया चार रुममध्ये काही महिला व आल्पवयीन मुली पुरुषा समोर व सोबत गाण्यावर नृत्य करतांना मिळुन आल्या. पोलिसांनी डिजेवरील गाणे बंद करुन तेथील पुरुष, महिला व आल्पवयीन मुलींना त्यांचे नाव गाव विचारले. तसेच आल्पवयीन मुलींना त्याचे वायाचे पुरावा व आधार कार्ड बाबत सविस्तर चौकशी करून त्यापैकी एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. कलाकेंद्रामधील शोरुममध्ये तिचे लैंगीक शोधन करुन वैश्या व्यवसाय करून घेत असल्याचे तिने सांगीतले.

सदर ठिकाणी कलाकेंद्रात आम्हाला दारु, गुटखा, सिगारेट, वापरलेले कॉन्डम व फ्रेश कॉन्डम मिळुन आले. त्यानंतर आम्ही अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष बीड येथील मसपोनि सुरेखा धस यांना बोलवुन घेऊन तसेच महिला तक्रार निवारण केंद्राचे खाडे यांच्या समक्ष सदर अल्पवयीन मुलीचा जवाब नोंदविला असुन तरी सर्व संबंधीत आरोपीतांवर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत (भा.पो.से.), सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग केज, पोनि बाळासाहेब पवार, मसपोनि सुरेखा धस, पोउपनि आनंद शिंदे. सफी बाळासाहेब रोडे, पोह राजु वंजारे, पोह श्रीकांत चौधरी, मपोह आशा चौरे, मपोह पाचपिंडे, पोना दिलीप गित्ते, पोना अनिल मंदे, पोना विकास चोपने, चापोह मल्लिकार्जुन माने, पोना युवराज भुंबे, पोका संतोष गित्ते यांच्या पथकाने केली आहे.





