माजी प्राध्यापकाची १ लाख ४० हजाराची बॅग अज्ञात चोरट्याने पळवली

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील कॅनरा बँके समोरून सेवा निवृत्त प्राध्यापकाची मोटारसायकल च्या हँडलला लावलेली १ लाख ४० हजार रूपयांची पिशवी अज्ञात चोरट्याने पळवून नेण्याची घटना घडली आहे. दिवसा ढवळ्या व नजरेसमोर घडलेल्या घटनेने संबंधित प्राध्यापक चांगलेच घाबरून गेले असून. घडलेल्या घटनेनुसार एका अनोळखी चोरट्याचा विरूद्ध जामखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, असलेले सेवानिवृत्त प्राध्यापक बाबुराव संभाजी राजेभोसले (वय ६४) वर्ष, मुळ रा. नान्नज (हल्ली रा. प्रभाकरनगर, जामखेड) हे आज दि. ६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जामखेड बसस्थानकासमोर असलेल्या कॅनरा बँकतील आपल्या पत्नीच्या शेतकरी कर्ज खात्यातून शेतकामासाठी आवश्यक १ लाख ४० हजार रूपयांची रक्कम काढली व ती आपल्या जवळील पिशवीत ठेवली व बँकेसमोर आपल्या मोटारसायकल च्या हैन्डलला पैसै आसलेली बॅग अडकवली यावेळी माजी प्राध्यापक यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत असताना समोरून आलेल्या एका इसमाने त्यांना काही समजायच्या आतच मोटारसायकल च्या हॅन्डलला पैसै आसलेली पिशवी घेवुन तेथुन पळ काढला. त्यावेळी सदर माजी प्राध्यापक यांनी आरडा ओरडा केला व सदर इसमाचे मागे पळु लागले. सदर चोर एस.टी. बस स्टॅण्डचे दिशेने गेला त्यावेळी रस्त्यावर पावसामुळे चिखल असल्याने पाठलाग करताना सदर प्राध्यापक हे चिखलात घसरून पडले. तोपर्यंत सदर इसम पळुन गेला. सदर चोरट्याचा बसस्थानक जामखेड व आसपासच्या परिसरात शोध घेतला. परंतु तो कोठेही दिसुन आला नाही.

पिडीत शेतकरी व सेवानिवृत्त प्राध्यापक बाबुराव संभाजी राजेभोसले (वय ६४), रा. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल केली आहे. सदर चोरी करणारा चोर अंदाजे २० ते २१ वर्ष वयाचा, अंगात राखाडी रंगाचा शर्ट व निळसर रंगाची जिन्स, अंगाने सडपातळ बांधाचा अशा वर्णनाचा होता. त्यास पाहील्यास मी ओळखेल.

तरी आज दि. ६ जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने वरील वर्णनाची मी कॅनरा बैंक, जामखेड या शाखेतून काढलेली माझे मोटारसायकल च्या हॅन्डलला अडकविलेल्या पिशवीत ठेवलेली रोख रक्कम पळवून नेली आहे. यावरून शेतकरी असलेले सेवा निवृत्त प्राध्यापक बाबुराव संभाजी राजेभोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका अनोळखी इसमाविरुध्द दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here